छाननीनंतर मडगावात 115 उमेदवार रिंगणात

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

मडगाव पालिकाच्या निवडणूकीसाठी 25 प्रभागांतून एकूण 115 उमेदवारांनी भरलेल्या 131 अर्जापैकी आज झालेल्या छाननी प्रक्रियेत 115 वैध ठरविण्यात आले

सासष्टी : मडगाव पालिकाच्या निवडणूकीसाठी 25 प्रभागांतून एकूण 115 उमेदवारांनी भरलेल्या 131 अर्जापैकी आज झालेल्या छाननी प्रक्रियेत 115 वैध ठरविण्यात आले. तर, 16 अर्ज अवैध ठरविण्यात आले. 10 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होणार असून त्यानंतर मडगाव पालिका निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.(After scrutiny, 115 candidates are in the ground for election in Madgaon)

दक्षिण गोव्यात11 एप्रिलला होणार बत्ती गुल

छाननी प्रक्रियेत अर्ज रद्दबातल ठरू नयेत यासाठी 16 उमेदवारांनी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरले होते त्या उमेदवारांचा प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरविण्यात आला. मडगाव पालिका निवडणूकीसाठी सर्वाधिक अर्ज प्रभाग 2 मधून दाखल झाले आहेत. या प्रभागात 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर प्रभाग 1 व 24 मधून 10 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. 

संबंधित बातम्या