
Goa Accidental Death : 30 ऑगस्ट रोजी अपघातग्रस्त झालेल्या व 11 सप्टेंबर रोजी निधन झालेल्या सिडनी डिसोझा याचा मृत्यू जर वेळीच पालक शिक्षक संघाच्या तक्रारीवर कारवाई झाली असती, तर टळला असता, असा आरोप पालक शिक्षक संघातर्फे करण्यात आला आहे.
संजय स्कूलच्या पालकांची 14 जानेवारी 2023 रोजी हेडमास्तर तातू कुडाळकर, संजीवन सक्षमचे चेअरमन सचिन बावासीर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही इमारत वापरण्याजोगी नसून त्यात संजय स्कूलच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही सोयी उपलब्ध नसल्याने, या इमारतीतील कार्यालय बंद करावे.
त्याचे स्थलांतर काहीही अघटीत होण्यापूर्वी करावे अशी लेखी पत्रे मुख्यमंत्री, उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांना पाठवावी असे बैठकीत दिव्यांग संस्थेचे आयुक्त गुरुदास पावसकर यांनी सुचवले होते,
परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा अनर्थ घडल्याचे पालक सांगत असून ते तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. 8 सप्टेंबर रोजी आणखी एक पत्र उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांस त्यांच्या कार्यालयात पाठवण्यात आले.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन पाहणी केली. व कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तद्नंतर तब्बल 22 दिवसांनी सदर घटना झाली.
नगर नियोजन खात्यातर्फे पर्वरी येथे संजय स्कूलच्या नावावर एक जमीन देण्यात आली होती व त्यावर लवकरात लवकर बांधकाम करून सदरच्या इमारतीतील वर्ग तिथे हलवावे असे एक पत्रही आठ सप्टेंबर रोजी पालक शिक्षक संघातर्फे पाठवण्यात आले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.