मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या लेखी आश्वासनानंतर स्वातंत्र्य सैनिक यांचे उपोषण मागे  

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

गेले आठ दिवस उपोषणास बसलेल्या स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आज गुरुवारी आपले उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर स्वातंत्र्य सैनिक यांनी हे आंदोलन मागे घेतले असून, यानंतर त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सरकारचे आभार मानले.

पणजी : गेले आठ दिवस उपोषणास बसलेल्या स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आज गुरुवारी आपले उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर स्वातंत्र्य सैनिक यांनी हे आंदोलन मागे घेतले असून, यानंतर त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सरकारचे आभार मानले.
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज उपोषणास बसलेल्या स्वातंत्र्य सैनिक यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना शेट तानवडे यांनी,  यंदा आपण गोवा मुक्तीचे 60 वे म्हणजेच हीरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. अशा वेळी गोव्याच्या मुक्तीसाठी आपले सर्वस्व अर्पण केलेल्या स्वातंत्र्य सैनिक यांची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्यच ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी काल बुधवारी विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार आज स्वातंत्र्य सैनिक यांच्या मुलांचा नोकरीचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले असल्याचे शेट तानवडे म्हणाले. तसेच याला प्रतिसाद देऊन स्वातंत्र्य सैनिक यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल आपण त्यांचे आभारी असल्याचे शेट तानावडे पुढे म्हणाले. 

याशिवाय पुढे बोलताना शेट तानवडे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी स्वातंत्र्य सैनिक यांच्या मुलांना आणि वारसांना तातडीने नोकरी मिळावी यासाठी विशेष तरतूद केली होती. कोणत्याही मुलाखती शिवाय त्यांची थेट भरती केली. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी ही हा प्रश्न तातडीने सुटावा यासाठी पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि काही बिगर सरकारी संस्थांनी या उपोषणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण तो असफल ठरल्याचे म्हणत श्री शेट तानवडे यांनी पुन्हा उपोषणास बसलेल्या स्वातंत्र्य सैनिक यांचे आभार मानले.
 

संबंधित बातम्या