गोव्यात कोरोना चा आकडा शंभरीपार मृतांचा संख्या ६९६ वर स्थिर 

Again Corona patients Increased in Goa
Again Corona patients Increased in Goa


पणजी: राज्यातील आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचे बळींची संख्या मागील काही दिवसांत शंभरी खाली आली होती. परंतु आता ती पुन्हा वाढली असून, मडगाव (१२१) आणि पर्वरी (१०१) या आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात संख्या शंभरीपार गेल्याचे दिसत आहे. मागील चोवीस तासांत कोरोनाचा एकही बळी गेला नसल्याची नोंद झाली आहे.

त्यामुळे बळींची संख्या ६९६ वर स्थिरावली आहे. राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात ९४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ९३ जणांना घरगुती विलगीकरणात राहून उपचार घेण्यास आरोग्य खात्याने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर ३३ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. प्रकृती सुधारामुळे मागील चोवीस तासांमध्ये १२४ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

१ हजार २९७ जणांच्या चाचण्यांचे नमुने तपासण्यात आले असून, राज्यभरात १ हजार ३८८ सक्रिय पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. सर्वात जास्त मडगाव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात रुग्ण असून, सर्वात कमी रुग्ण (०५) कासारवर्णे आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७० टक्के असून, आत्तापर्यंत कोरोनातून ४६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com