गोवा दिल्लीच्याही पुढे; गोव्यातील तरुण नाही, तर मुलंही दारू पिऊ शकतात!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मार्च 2021

दिल्लीत मद्यप्राशन करण्यासाठीचे वय 21 वर्षे करण्यात आले आहे. मात्र गोव्यात मद्यप्राशन करण्यासाठी 18 वर्ष वयाची अट आहे. गोव्यात 18 व्या वर्षीच तरूण मद्यप्राशन करू शकतात.

 

पणजी: आठवड्याच्या सुरूवातीला दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या या नवीन धोरणात मद्यप्राशन करण्याच्या वयोमर्यादेत मोठा बदल करण्यात आला आहे. हल्लीच दोन दिवसाआधी दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण जाहीर केले आहे. त्याअंतर्गत दिल्लीत मद्यप्राशन करण्याचे कायदेशीर वय 25 वरून 21 करण्यात आले आहे.  यापूर्वी दिल्लीत मद्यप्राशन करण्यासाठी किमान वय 25 वर्ष असणे आवश्यक होते. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आलेला असून, ते 21 वर्षे करण्यात आले आहे. मात्र गोव्यात मद्यप्राशन करण्यासाठी 18 वर्ष वयाची अट आहे. गोव्यात 18 व्या वर्षीच तरूण मद्यप्राशन करू शकतात.

कायदेशीर मद्यपान करण्याच्या वयाची मर्यादा कमी करण्याची शिफारस दिल्ली सरकारच्या मंत्र्यांच्या गटाने अबकारी धोरण सुधारणांबाबत केली होती. त्याला दिल्ली मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. आता गोव्यात मद्यपान करण्याचे कायदेशीर वय 18 आहे. हे सर्वात कमी कायदेशीर  मद्यप्राशन करण्याचे वय आहे आणि हे आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक, राजस्थान, सिक्कीम आणि पुडुचेरी, लडाख आणि जम्मू केंद्रशासित प्रदेशांमध्ये  काश्मीरमध्येही लागू आहे.

पर्यटन आकर्षण केंद्र म्हणून गोवा इतर देशात खूप लोकप्रिय आहे. गोवा पर्यटनाचे फॅन्स देशभर आहेत. मद्यपान करतांना आनंद उपभोगायचा असेल तर पर्यटक गोवा राज्याची निवट करतात. गोव्यातील तरुणांसाठी, प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मित्रांसोबत चिल करणे हे काही नविन नाही. या सगळ्या गोष्टा त्यांच्यासाठी अति सामान्य झाल्या आहे. मात्र अति प्रमाणात अल्कोहोल पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

गोवा शिगमोत्सव राज्यभर सादर करण्याची कलाकारांची मागणी 

18 वर्षाच्या तरूणांना मतदानास परिपक्व समजले जाऊ शकते तर मग त्यांना दारू पिण्याची परवानगी का दिली जाऊ शकत नाही? असे मत गोव्यातील नागरिकांचे आहे. पण अशात नियमांचे पालन केले जात नाही. शैक्षणिक संस्था आणि धार्मिकस्थळांच्या जवळ दारू विक्रीची दुकाने आहेत. जे नियमांच्या विरोधात आहे. आणि हो,  दारू विकत घेण्यासाठी आपल्या दुकानात येणाऱ्या तरुणांची आयडी गोव्यात कोणी तपासत आहेत का? पोलिस व उत्पादन शुल्क विभाग आपली कर्तव्य बजावत आहेत आणि अल्पवयीन मुलांना दारू देणारे बार आणि रेस्टॉरंट्स तपासत आहेत का? असे कितीतरी प्रश्न आहेत जे गोव्याच्या बाबतीत उपस्थित राहू शकतात. 

Goa Budget 2021: नवे फेणी धोरण लवकरच जाहीर; नारळ फेणीसाठी प्रक्रिया सुरू 

दिल्लीतील सरकारी दारुची दुकाने आता बंद होणार असून, निविदाद्वारे खासगी लोकांना मद्य दुकानांचे परवाने देण्यात येणार आहेत. नव्या नियमांनुसार दारूच्या दुकानात 500 चौरस मीटर जागा असणे बंधनकारक असणार आहे. नव्या धोरणामुळे सरकारच्या अपेक्षेनुसार सरकारला मिळणाऱ्या वार्षिक महसुलात २ हजार कोटी रुपयांची वाढ होणार आहे. दिल्लीत (Delhi) सध्या 850 दारूची दुकाने आहेत. तर आता नवीन दुकाने उघडली जाणार नाहीत. त्याऐवजी जुन्या दुकानांचीच वितरण व्यवस्था दुरुस्त केली जाईल.

Goa Budget 2021: कोरोना काळातही गोव्याची अर्थव्यवस्था कशी सावरली?

तेव्हा गोव्यातीही मद्यप्राशन करण्याच्या वयोमर्यादेत बदल व्हावा असे तुम्हाला वाटते ता? कारण मतदानाचा आणि मद्यप्राशन करण्याचा अधिकार गोव्यात 18 व्या वर्षीच मिळतो. पण 18 व्या मतदान करणे देशाच्या हिताचे असले तरी, 18 व्या वर्षी मद्यप्राशन करणे हे शरीराच्या हिताचे नाही.

संबंधित बातम्या