.. 'म्हणून' बांबोळीतील गाडेधारकांनी घेतला निर्णय

अखेर बांबोळीतील गाडेधारकांचे तब्बल 50 दिवसांनंतर आंदोलन मागे
Agitation of vendors at Bambolim was withdrawn
Agitation of vendors at Bambolim was withdrawnDainik Gomantak

पणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळाच्या आवाराबाहेरील गाडेधारकांनी पुनर्वसनासाठी सुरू केलेले धरणे आंदोलन काल 50 दिवसांनंतर मागे घेतले. सरकारने या पुनर्वसनासाठी काम सुरू केले आहे व त्यासंदर्भातचे कंत्राटही दिले असल्याने हे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची माहिती गाडेधारकांनी दिली. (agitation of vendors at Bambolim was withdrawn)

Agitation of vendors at Bambolim was withdrawn
'त्या' समारंभाला निर्माण करण्यात आलेल्या अडचणीचा गावकरांनी वाचला पाढा

गेल्यावर्षी भर पावसात गोमेकॉ (GMC) इस्पितळाबाहेर असलेल्या फळभाजी विक्रेते तसेच इतर गाडे हटविण्याची मोहीम राबवण्यात आली होती. ही मोहीम राबवताना सरकारने गाडेधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात कोणतेच आश्‍वासन न दिल्याने आंदोलन सुरू करण्यात आले होते. या मतदारसंघातील स्थानिक आमदारांनी (MLA) पुढाकार घेऊन या गाडेधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेतही आवाज उठविला होता. सरकारने त्यावेळी पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर हे आश्‍वासन पूर्ण होत नसल्याचे गाडेधारकांना वाटल्यानंतर त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले होते.

Agitation of vendors at Bambolim was withdrawn
Goa Covid Updates: गोव्यात कोरोनाची तिसरी लाट

जोपर्यंत पुनर्वसनासंदर्भात ठोस लेखी आश्‍वासन दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊन ते गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपासून सुरू केले होते व सरकारवर (Goa Government) दबाव आणला होता.

गाडेधारकांचे आंदोलन सुरू असताना गेल्यावर्षी डिसेंबर महिन्याच्या मध्यास सरकारने गोमेकॉ इस्पितळाची संरक्षक भिंत तोडून तेथे जागा उपलब्ध करण्यासाठी काम सुरू केले होते. हे काम सुरू होऊनही गाडेधारकांनी सुरू केलेले धरणे आंदोलन सुरूच ठेवले होते. हे गाडेधारक नेहमी या इस्पितळाच्या आवाराबाहेर अर्धा दिवस बसून आंदोलन करत होते. त्यामुळे सरकारवर दबाव येऊन हे काम जोरात सुरू आहे. सध्या निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे व कामही सुरू असल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com