"जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे प्रकल्पांविरोधात सुरू असलेल्या जन आंदोलनांचे अपयश नव्हे"

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

जिल्हा पंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मिळालेले यश हे विविध प्रकल्पांविरोधात सुरू असलेल्या जन आंदोलनांचे अपयश नव्हे

पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मिळालेले यश हे विविध प्रकल्पांविरोधात सुरू असलेल्या जन आंदोलनांचे अपयश नव्हे असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी आज नमूद केले.

ते म्हणाले लोहमार्ग दुपदरीकरण, तम्नार गोवा वीज वाहिनी, कोळसा वाहतूक, महामार्ग रूंदीकरण याला विरोध करण्यासाठी लोकांनी ही आंदोलने चालवली आहेत. विरोधी पक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. या निवडणुकीत भाजपला यश मिळाले याचा हे प्रकल्प पुढे रेटण्यासाठी परवाना मिळाला असा समज सत्ताधारी भाजपने करून घेऊ नये.  ही आंदोलने व विरोध सुरुच राहील असेही त्यांनी नमूद केले.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या