मडगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी आग्नेलो फर्नांडिस

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या  करण्यात आल्या असून त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात मडगाव पालिकेच्या  मुख्याधिकाधिकारी पदी राज्य  सरकारने आग्नेल फर्नांडिस यांची नियुक्ती केली आहे. 

पणजी- मडगाव पालिकेच्या  मुख्याधिकाधिकारी पदी राज्य  सरकारने आग्नेल फर्नांडिस यांची नियुक्ती केली आहे. 

अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या  करण्यात आल्या असून त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकपदी संजीव गडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच गोवा राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी विकास गावणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार निबंधक या पदाची जबाबदारी   बिजू नाईक यांच्यावर सोपवण्यात आली आहे.  नितल अमोणकर यांची संजय स्कूलच्या सदस्य सचिवपदी आणि त्रिवेणी वेळीप यांची मुख्य कार्यकारी अधिकारी,दक्षिण गोवा जिल्हा पंचायत येथे नियुक्ती करण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या