आगोंद, गालजीबाग येथे १७ समुद्र कासवांना जीवदान

dainik gomantak
सोमवार, 29 जून 2020

मात्र, यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाला त्यामुळे सागरी कासवांची अंडी उबण्यास अडथळा निर्माण झाला, असे सेंटर फॉर इनव्‍हायरर्मेंट एज्युकेशनचे प्रोग्रेम संयोजक सुरजीत डोंगरे यांचे म्हणणे आहे.

काणकोण,

सागरी कासवासाठी आरक्षित केलेल्या आगोंद, गालजीबाग येथून १७ सागरी कासवांनी जन्म दिलेल्या पिलांना समुद्रात सोडण्यात आले.
यंदा गालजीबाग येथे सहा व आगोंद किनाऱ्यावर बारा सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी अंडी घातली होती. त्यापैकी आगोंद किनाऱ्यावर एका सागरी कासवाचे उशिरा एप्रिल महिन्यात आगमन झाले. त्या एका घरट्यातून अद्याप पिले बाहेर आली नाहीत, साधारणपणे ४५ ते ५५ दिवसांत घरट्यातून पिले बाहेर येतात. मात्र, बदलत्या वातावरणाचा सागरी कासवांच्या आगमनानंतर यंदा परिणाम झाल्याचे क्षेत्रिय वनाधिकारी विक्रमादित्य नाईक गावकर यांनी सांगितले.
२०१६-१७ साली आगोंद किनाऱ्यावर २८ सागरी कासवांनी अंडी घातली होती. गेल्यावर्षी १९ सागरी कासवांचे आगमन किनाऱ्यावर झाले. मात्र, यंदा ही संख्या बारावर आली. उत्तर गोव्यात अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याचे प्रमाण ७५.८० टक्के राहिले आहे. यंदा सागरी कासवाचे आगमन बदलत्या हवामानामुळे लांबले. घरट्यातून अंडी उबून पिल्ले बाहेर येण्यासाठी उबदार हवामानाची गरज असते. मात्र, यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाला त्यामुळे सागरी कासवांची अंडी उबण्यास अडथळा निर्माण झाला, असे सेंटर फॉर इनव्‍हायरर्मेंट एज्युकेशनचे प्रोग्रेम संयोजक सुरजीत डोंगरे यांचे म्हणणे आहे.

 

संबंधित बातम्या