Goa Farming : डिचोलीत शेतीकामांना गती

पावसाची विश्रांती ; पिळगाव, साळ परिसरात 'तरवा' लागवड
Farming in Goa
Farming in GoaDainik Gomantak

डिचोली : पावसाचा जोर कमी झाल्यानंतर शेतीकामाला वेग आला असून डिचोलीतील विविध भागात पुन्हा एकदा बळीराजा नव्या जोमात शेतीत उतरला आहे. सध्या सर्वत्र ''तरवा'' लागवडीची लगबग चालू झाली आहे.

पिळगावसह काही भागात शेतकऱ्यांनी तरवा लागवडीची कामे हाती घेतली आहेत. जवळपास पंधरा दिवस पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर बहुतेक भागातील शेती पाण्याखाली आली होती. त्यामुळे शेतीकामे खोळंबून राहिली होती.

Farming in Goa
अपघातप्रकरणी टेंपो चालकाला बेड्या ठोकल्या

दरम्यान,''कोसळ''धार पावसामुळे ''तरव्या''ची नासधूस झाल्याने मयेसह सखल भागातील शेतीत लागवडीची कामे काहीसी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पिळगाव, बोर्डे, मये, शिरगाव, कुडचिरे, साळ, मेणकूरे, धुमासे आदी भागात खरीप भातशेती पिक घेण्यात येते. यंदा ३५० हून अधिक हेक्टर शेती लागवडी येणार असल्याचा दावा आहे. कृषी खात्याच्या सूत्रांकडून तशी माहितीही उपलब्ध झाली आहे.

मशागतीची कामे उरकून शेतकऱ्यांना लागवडीच्या कामाची प्रतीक्षा लागून राहिली असतानाच पावसाने कहर केला. जवळपास पंधरा दिवस पावसाचा जोर होता. त्यामुळे शेतीकामे खोळंबून राहिली होती.

मात्र आता गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकरी ''तरवा'' लागवडीच्या कामाकडे वळला आहे. पावसाने कृपा केल्यास आठवडाभरात बहूतेक भागात लागवडीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. असा अंदाज पिळगाव भागातील शेतकरी विष्णू गिमोणकर आणि काशीनाथ पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.

मयेत लागवड लांबणीवर

मयेतील सखल भागातील शेती पाण्याखाली गेली होती. त्यामुळे वर आलेल्या तरव्याची नासधूस झाली. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर पुन्हा तरवा पेरण्याची पाळी आली आणि त्यामुळे लागवड लांबणीवर पडली.

पावसाचा फटका बसलेल्या भागात शेती लागवडीची कामे किमान आठवडाभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, असे शेतकरी नागेश नाईक गावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com