शेतीकामे खोळंबली, भाजी लागवड धोक्‍यात; पावसाची प्रतीक्षा

 Agriculture is in decline, vegetable cultivation is in danger; Waiting for the rain
Agriculture is in decline, vegetable cultivation is in danger; Waiting for the rain

डिचोली, 

दमदार सुरवातीनंतर मागील चार-पाच दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने डिचोलीतील बळीराजा अस्वस्थ बनला असून शेतीकामे खोळंबून पडली आहेत.

लावणीसाठी तयार झालेला तरवा सुकून जात असून भाजी लागवडीवरही परिणाम झाला आहे. भाजीची रोपेही करपण्याच्या वाटेवर आहेत.
दहा-बारा दिवसांपूर्वी पावसाने जोरदारपणे सुरवात केल्यानंतर तालुक्‍यातील बळीराजा सुखावला होता. समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी शेती नांगरणीच्या कामाला जोर दिला होता.

डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्य क्षेत्रात येणाऱ्या साळ गावासह मेणकुरे, धुमासे, अडवलपाल, मये, पिळगाव, शिरगाव, बोर्डे, म्हावळिंगे, कुडचिरे आदी भागात सध्या शेतीकामे जोरात सुरू झाली होती.

सर्वत्र शेतजमीन नांगरणीची कामे सुरू करतानाच दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांनी तरवा लागवड आणि पेरणीची तयारी सुरू केली होती. मात्र, सध्या पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे अडली आहेत. काही ठिकाणी तर शेती नांगरणीची कामे अर्धवट आहेत.

लावणीसाठी तरवा तयार झाला असतानाच काही ठिकाणी पावसाअभावी तरवा करपून जाण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे शेतकरी चिंताक्रांत बनले आहेत. कधी एकदाची पर्जन्यवृष्टी सुरू होते आणि अडलेली शेतीकामे करण्यास मिळते याची बळीराजाला प्रतीक्षा आहे. यावर्षी मॉन्सूनने आशादायक वातावरण निर्माण केले होते.

भाजी मळे सुकताहेत!

डिचोलीतील बहुतेक भागात शेतकऱ्यांनी भाजी लागवडही केली आहे. मळ्यांनी भाज्यांची रोपे उगवली असतानाच, पावसाने वक्रदृष्टी केल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. पाऊस गायब झाल्याने भाज्यांचे मळे सुकण्याच्या वाटेवर आहेत.

काहींनी विहिरी वा उपलब्ध होणाऱ्या पाण्याने मळे शिंपण्यासही सुरवात केली आहे. नार्वे येथील देवगाळ मळावरील शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात भाजी लागवड करण्यात येते. यंदाही देवगाळ येथे भाजीच्या मळ्यांनी विविध जातींच्या भाज्यांची लागवड केली आहे.

या मळ्यांनी भाज्यांची रोपे उगवल्याने शेतकऱ्यांनी खत आदी मशागतीची कामे हाती घेतली असतानाच पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com