Goa Agricultural Policy: राज्याचे कृषी धोरण बनविण्याला गती : रवी नाईक

Agriculture Minister Ravi Naik: सूचना, हरकती मागविणे सुरू; जानेवारी 2024 पर्यंत होईल पूर्ण
Agriculture Minister Ravi Naik
Agriculture Minister Ravi NaikDainik Gomantak

Agriculture Minister Ravi Naik: राज्यातील सर्व प्रकारच्या कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देणारे आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे कृषी धोरण बनवण्याचे काम सुरू झाले असून यासाठी सूचना, हरकती मागवण्यात आल्या आहेत.

जानेवारी २०२४ पर्यंत हे धोरण तयार होईल, अशी माहिती कृषिमंत्री रवी नाईक यांनी सोमवारी (ता.११) दिली.

राज्य सरकारचे कृषी धोरण तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक, समितीचे अध्यक्ष आणि कृषिमंत्री रवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी कृषी संचालक नेव्हिल आल्फोन्सो, डॉ. नंदकुमार कामत, आमदार विजय सरदेसाई, आयसीएआरचे डॉ. परविन कुमार, फादर जॉर्ज, मार्केटिंग कमिटीचे प्रकाश वेळीप, माजी संचालक सतीश तेंडुलकर, रॉड्रिग्ज, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीरंग जांभळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा झाली.

Agriculture Minister Ravi Naik
Margao: नोकरभरती प्रक्रिया का रोखली: कॉंग्रेस नेते एल्विस गोम्स

‘कृषी भाडेकरार’ आणणार

राज्य सरकारने मान्य केलेल्या कृषी भाडेकरार कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी महसूल विभागाला विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल.

गोवा राज्याच्या कृषी धोरणात इतर राज्यांतील कृषी धोरणांच्या सर्वोत्तम तरतुदींचा समावेश असावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे मंत्री नाईक म्हणाले.

"सरकारचे हे धोरण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आणि उपयुक्त असे बनवले जाईल. धोरण बनवण्याकरता २५ ते ३० प्रमुख क्षेत्रे तयार केली जातील आणि या क्षेत्रांच्या सेटवर काम करण्यासाठी ५ उपसमित्या स्थापना केल्या जातील. उपसमित्यांची स्थापना करताना शेतकरी आणि इतर सर्व भागधारकांकडून त्यांची मते, सूचना ऐकून घेतल्या जातील."

- रवी नाईक, कृषिमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com