Novenas of St Francis Xavier: ओल्ड गोवा पंचायत सदस्यांनी फेस्तमध्ये अवैध पद्धतीने पैसे उकळले; रॉड्रिग्ज यांचा आरोप

'सिली सोल्स' प्रकरणानंतर पुन्हा एकदा रॉड्रिग्ज यांनी केला आरोप
Novenas of St Francis Xavier
Novenas of St Francis XavierDainik Gomantak

ओल्ड गोवा पंचायत क्षेत्रात सेंट फ्रान्सिस झेवियर येथे नोव्हेन्स फेस्त सुरु आहे. या फेस्तमध्ये फेरीवाले आणि विक्रेत्यांकडून पंचायत सदस्य पैसे उकळले असल्याचा आरोप आयरिश रॉड्रिग्ज यांनी केला आहे.

(Aires Rodrigues alleged that the old Goa panchayat members extorted illegal money from the hawkers)

सिली सोल्ससारखे प्रकरण ज्यांच्या आरटीआयद्वारे उजेडात आले. ते आयरिश रॉड्रिग्ज यांनी जुने गोवा पंचायत सदस्य फेरीवाल्यांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप केला आहे. ओल्ड गोवा पंचायत सदस्य विनोद देसाई यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर नोव्हेन्स दरम्यान पैसे उकळले आहेत. असा आरोप त्यांनी केला.

Novenas of St Francis Xavier
Goa Latest News: पहिली पिंक ऑटो खरेदी करणारी गोव्यातील 'प्रीती केरकर'

पुढे बोलताना रॉड्रिग्ज म्हणाले की, या घोटाळ्यात जुने गोवा पंचायतीचे सरपंच तसेच काही सदस्य यांचा देखील सहभाग आहे. तसेच काही राजकारण्यांचे त्यांना वरदहस्त आहे. त्यामुळे फेरीवाल्यांकडून सहजच हे उकळले जात असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

Novenas of St Francis Xavier
Jacinto Island Accident: भरधाव कारची दुचाकीला धडक; महिला जागीच ठार

याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालतं हा प्रकार थांबवणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आयरिश रॉड्रिग्ज यांनी केलेल्या आरोपावर पुन्हा खळबळ होणार का? अथवा ओल्ड गोवा पंचायत सरपंच आणि सदस्य या आरोपाचे खंडण करणार का? या हे पाहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com