ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसचे अग्निपथ योजनेविरोधात आझाद मैदानावर निदर्शने

केंद्र सरकारने घोषित केलेल्या 'अग्निपथ' घोषणेला विरोध करण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी नागरिकांकडून निदर्शने सुरु आहेत.
ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसचे अग्निपथ योजनेविरोधात आझाद मैदानावर निदर्शने
AITUC members protesting against Agneepath Scheme on Azad maidanDainik Gomantak

पणजी : ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (AITUC) ने अग्निपथ योजना मागे घेण्याच्या मागणीसाठी आज आझाद मैदानावर जोरदार निदर्शने केली.

AITUC members protesting against Agneepath Scheme on Azad maidan
गोवा मराठी चित्रपट महोत्सव ऑगस्टमध्ये!

देशातील उद्योजकांनी केले 'अग्निपथ'चे समर्थन

केंद्र सरकारने घोषित केलेल्या 'अग्निपथ' घोषणेला विरोध करण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी नागरिकांकडून निदर्शने सुरु आहेत. या निदर्शनांमध्ये अनेक ठिकाणी जमावाने हिंसक होत जाळपोळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तर काही ठिकाणी जमावाने ट्रेन पेटवल्याची घटना ही घडल्या आहेत.असे असले तरी देशातील अनेक दिग्गज उद्योजकांनी अग्निपथ योजनेचे समर्थन केले आहे.

याबाबत बोलताना देशातील अनेक दिग्गज उद्योजकांनी काळजी करू नका, कॉर्पोरेट क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. असे म्हणत युवकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, आरपीजी एंटरप्रायझेसचे चेअरमन हर्ष गोयंका आणि बायोकॉन लिमिटेडचे ​​चेअरपर्सन किरण मुझुमदार-शॉ यांनी सोमवारी लष्करी भरतीसाठी अग्निपथ योजनेचे समर्थन करताना युवकांसाठी हा पर्याय उपलब्ध असल्याचं म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com