सर्वण पंचायत पोटनिवडणुकीत अजास खान विजयी

दैनिक गोमंतक
सोमवार, 26 एप्रिल 2021

डिचोली तालुक्यातील कारापूर-सर्वण पंचायतीच्या पोटनिवडणुकीत अजास हमीद खान निवडून आले आहेत.

डिचोली: डिचोली तालुक्यातील कारापूर-सर्वण पंचायतीच्या पोटनिवडणुकीत अजास हमीद खान निवडून आले आहेत. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी माजी पंच राजेश मोहन नाईक यांचा पराभव केला. कारापूर-सर्वण पंचायतीच्या प्रभाग-2  साठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या प्रभागातून 85.96 टक्के मतदान झाले होते. एकूण 627 मतदारांपैकी 538 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या पोटनिवडणूकीसाठी पाचजण रिंगणात होते.  अजास खान यांना  190 मते पडली. जवळचे प्रतिस्पर्धी राजेश नाईक यांना 144 तर भालचंद्र बाक्रे यांना 143 मते पडली. (Ajas Khan wins all Panchayat elections) 

संबंधित बातम्या