Goa BJP: अद्याप आजगावकर यांच्या नावाची उमेदवारीसाठी घोषणाच झालेली नाही

उमेदवारीवरून मडगावातील भाजप कार्यकर्ते संभ्रमित
 Goa BJP
Goa BJPDainik Gomantak

मडगाव: निवडणुकीची घोषणा होऊन आठवडा उलटत आलेला असला तरी मडगावातील भाजप उमेदवार अजून ठरत नसल्याने प्रचाराला सुरवात झालेली नाही. त्यामुळे येथील भाजप कार्यकर्ते संभ्रमित अवस्थेत आहेत. मडगाव भाजप (Goa BJP) मंडळ अध्यक्ष रुपेश महात्मे यांनी मंडळाने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांच्या नावाची उमेदवारीसाठी शिफारस केलेली आहे असे सांगितलेले असले, तरी अजून त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे त्यांचा प्रचार सुरु झालेला नसल्याने काहीसे गोंधळाचे वातावरण आहे. (Goa Elections 2022: Ajgaonkar name has not been announced yet for goa bjp election candidate)

 Goa BJP
खनिज वाहतूक कंत्राटदार आल्याशिवाय मृतदेह न हलविण्याचा हेका...

पक्षाकडून अधिकृत उमेदवारांच्या (Election Candidate) नावाची घोषणा येत्या बुधवारी होणार असल्याने तोपर्यंत प्रतीक्षा करण्याचे धोरण स्थानिक नेत्यांनी अवलंबिले आहे. मात्र, दुसरीकडे काही नेते उघडपणे अन्य पक्षांच्या उमेदवारांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर करू लागल्याने पुन्हा कार्यकर्ते गोंधळात पडल्याचे दिसत आहे व या प्रकरणात पक्षश्रेष्ठी काहीच स्पष्टीकरण करताना दिसत नाहीत.

आजवर प्रत्येक निवडणुकीत भाजपने उमेदवाराबाबत असेच धोरण पत्करलेले आहे. यावेळी सुरवातीला असाच वेळकाढूपणा केल्यानंतर डॉ. देश प्रभुदेसाई यांचे नाव निश्र्चित केले गेले व त्यांनी पुढाकार घेऊन मडगावात पक्षाचे कार्यालयही सुरू केले, पण त्यावेळी मंडल अध्यक्ष व भाजप नगरसेवक अनुपस्थित असल्याने ती चर्चा रंगली व नंतर अन्य काहींनी देश यांच्या विरुध्द उघड भूमिका घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देश यांनी माघार घेतली व नंतर आजगावकर यांचे नाव पुढे आले, पण अजून त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com