आकाश इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना ‘जेईई’ मध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

गोवा- आकाश इन्स्टिट्यूट च्या गोव्यातील विविध शाखांमधील हुशार विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करत जेईई मेन्स परीक्षा २०२० मध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.

पणजी: गोवा- आकाश इन्स्टिट्यूट च्या गोव्यातील विविध शाखांमधील हुशार विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करत जेईई मेन्स परीक्षा २०२० मध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. जेईई मेन्स २०२० परीक्षेचा निकाल कालच घोषित करण्यात आला. नमूद करण्यायोग्य गोष्ट म्हणजे आकाश इन्स्टिट्यूटच्या पणजी शाखेतील वेदांत नित्यानंदन ने ९९.३२ टक्के गुण मिळवले असून त्यानंतर पणजी शाखेच्या प्रतीक सी. कुबलने ९७.९२ टक्के, पणजी शाखेच्या पौरव रोहिला ने ९७.८१ तर मड़गाव शाखेच्या प्रथमेश प्रेमानंद ने ९७.५० टक्के गुण मिळवले आहेत.

या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतांना आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) चे संचालक आणि सीईओ  आकाश चौधरी यांनी सांगितले, ‘आमच्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे की आमच्या २८ हुशार विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स २०२० मध्ये चांगली कामगिरी करत गोव्यात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. हे सर्व श्रेय आमचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी केलेल्या परिश्रमामुळे प्राप्त झाले असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात मार्गदर्शन केले. आमची गुणवत्तापूर्ण परीक्षा तयारीची पध्दत ही बाजारपेठेतील सर्वोत्कृष्ट असून त्यामुळे विद्यार्थ्यांना मेडिकल आणि इंजिनियरींग परिक्षेसाठी तयार होणे सोपे जाते.’

विद्यार्थ्यांच्या या गुणांचे खरोखरच कौतुक करणे आवश्यक आहे कारण त्यांच्या कष्टांमुळे आणि आकाश आयआयटी-जेईई च्या प्रशिक्षकांनी परिक्षेसाठी दिलेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे. ही परिक्षा ही जगातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. जेईई मेन्स परीक्षा पास झाल्यावर विद्यार्थ्यांना एनआयटीज, आयआयटीज आणि सीएफटीआयज मध्ये प्रवेशासाठी हे गुण ग्राह्य धरले जातात. 

ही एक आनंदाची बाब आहे कारण संपूर्ण देशभरांतून जेईई मेन्स ला ६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.

संबंधित बातम्या