राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत अक्षय अनवेकर प्रथम

वार्ताहर
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

वास्को येथील अनबिटेबल डान्स अकादमीतर्फे आयोजित ‘नचके दिखा २०२०’ या राज्यस्तरीय ऑनलाईन एकेरी नृत्य स्पर्धेत फोंडा येथील अक्षय अनेवकर याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

दाबोळी: वास्को येथील अनबिटेबल डान्स अकादमीतर्फे आयोजित ‘नचके दिखा २०२०’ या राज्यस्तरीय ऑनलाईन एकेरी नृत्य स्पर्धेत फोंडा येथील अक्षय अनेवकर याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

अनबिटेबल डान्स अकॅडमीतर्फे निर्मित कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी ‘नचके दिखा २०२०’ या स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले होते. या स्पर्धेत भरघोस प्रतिसाद लाभला. एकूण ३० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून गृहनिर्माण मंडळाचे सदस्य सुदेश भोसले, खास अतिथी म्हणून समाज कार्यकर्ते विनोद किनळेकर,  अनबिटेबल डान्स अकादमीचे संस्थापकीय सदस्य तुषार वळवईकर, संस्थेचे इतर सदस्य उपस्थित 
होते. 

स्पर्धेचे उपविजेतेपद निकिता केलागिरी सावर्डे व मानसी रजनी, वास्को या दोघींना विभागून देण्यात आले. 
स्पर्धेतील सर्वात तरुण स्पर्धक या नात्याने डान्स इंस्टाग्रामवर प्रेक्षकांमार्फत निवड केलेली प्रीती नाईक (वाळपई) या स्पर्धकांना बक्षीस प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेत उत्तम नृत्य सादरीकरण केल्याबद्दल बारा स्पर्धकांची बक्षिसासाठी निवड करण्यात आली. यात अनुक्रमे रिया केरकर (पणजी), विशाल राठोड (फोंडा), सिया परब (साखळी), सेजल मठकर (फोंडा), प्रीती नाईक (वाळपई), प्रांजल डोकी (फोंडा), मेहक मालविया (फोंडा), साईश निपाणीकर (म्हापसा), सपना सरोज (सांकवाळ), साची गावकर (वास्को), सीयरन दा कोस्ता (दाबोळी) व प्रेक्षा देसाई (कुठ्ठाळी) यांचा समावेश होता.

स्टार प्लस इंडियन डान्सिंग फेम कलाकार विकास सावंत यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वळवईकर यांनी स्वागत व आभार मानले.
 

संबंधित बातम्या