गुळेली ग्रामपंचायत प्रभाग एक मधून अक्षिता गावडे बिनविरोध

गुळेली ग्रामपंचायत प्रभाग एकमध्ये निकाल स्पष्ट
Guleli Gram Panchayat
Guleli Gram PanchayatDainik Gomantak

गुळेली: गुळेली ग्रामपंचायत प्रभाग एक हा एसटी महिलांसाठी आरक्षित आहे. आज शेवटच्या दिवशी अक्षिता अनिल गावडे यांचा एकमेव अर्ज भरला असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उद्या याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

( Akshita Gawde unopposed from Ward One in Guleli Gram Panchayat Election)

Guleli Gram Panchayat
Panchayat Election : मगोपचे अस्तित्वच दावणीला!

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचे खंदे समर्थक आणि माजी पंच अनिल गावडे यांच्या त्या पत्नी आहेत. आजच्या या एकमेव अर्जामुळे या प्रभागावर विश्वजीत राणेंना या प्रभागातील सर्वांचे सहकार्य आहे. हे या निवडीवरुन दिसून येते. तसेच यावरुन राणे यांनी आपले एकहाती नेतृत्व आज ही कायम राखले असल्याचे म्हणता येणार आहे.

Guleli Gram Panchayat
दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूक कोंडी, पोलिसांची दमछाक

गोवा राज्यात या निवडणूकीवरुन चांगलेच धुमशान उडू लागले आहे. विरोधकांना चित करण्यासाठी राजकिय पक्ष नव - नवे डावपेचांनी विजयाची माला खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असताना गुळेली ग्रामपंचायत प्रभाग एकमध्ये मात्र वेगळीच स्थिती आहे. ज्याच्यामूळे या प्रभागाचा निकाल आजच लागला आहे.

महालवाडा,पैंगीण पंचायतीची निवडणूक बिनविरोध

पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राजकिय वातावरण चांगलेच तापले असताना पैंगीण पंचायतीच्या महालवाडा येथे मात्र थोडी वेगळी स्थिती आहे. कारण या वार्डातून सुनील पैंगणकर बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरूद्ध एकही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

मात्र अधिकृत घोषणा निर्वाचन अधिकारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करणार आहेत. आता पर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार काणकोण मधील सात पंचायतीच्या 59 वार्डातून पैंगीण पंचायतीच्या महालवाडा वार्डाणतून पैंगणकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com