गोव्यात कोरोना नियंत्रीत; महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने राज्यात कोरोना नियंत्रणासाठी उचललेल्या पावलांमुळे व  उपलब्ध करून दिलेल्या उपचार पद्धतीमुळे राज्यात कोरोना  बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आलेला आहे.

पणजी : गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने राज्यात कोरोना नियंत्रणासाठी उचललेल्या पावलांमुळे व  उपलब्ध करून दिलेल्या उपचार पद्धतीमुळे राज्यात कोरोना  बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आलेला आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार  कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच अंशी कमी झालेले असून राज्यामध्ये सध्या कोरोना वरील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 488 आहे. गेल्या 24 तासांत 39 नवे कोरोना संसर्गित रुग्ण सापडले आहेत, तर 44 कोरोना संसर्गित रुग्ण बरे झाले. गेले 4 दिवस कोरोनामुळे एकही बळी न गेल्यामुळे कोरोनामुळे  मृत्यू होणाऱ्यांची संख्या 787 आहे. 

गोव्याच्या नामांकित रेस्टॉरंट मालकावर बलात्काराचा आरोप

दरम्यान, शेजारील महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा थैमान घातले असून, त्यामुळे तेथे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. विदर्भातील अमरावतीत 7 दिवसांचा लॉकडाऊन घोषित कऱण्यात आला असून, पुणे, नाशिक या ठिकाणी नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य सरकार येत्या आठ दिवासांत कोरोना रूग्णांमध्ये किती वाढ होते, याचा आढावा घेऊन पुढील आठवड्यात लॉकडाऊन संबंधी निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. 

गोवा नगरपालिका निवडणूक 20 मार्चला; आजपासून आचारसंहिता लागू

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांमध्ये होत असलेली वाढ बघता शेजारील कर्नाटकाने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक कऱण्यात आली आहे. या उद्रेकामुळे घाबरून न जाता, सतर्क राहण्याचे व पर्यटकांनीदेखील सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं आहे. गोव्यात जरी कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली, तरी काही दिवसांवर असलेला जत्रोत्सव व शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे. 

 

 

संबंधित बातम्या