'शांतादुर्गा विद्यालय' सोमवारपासून पूर्णपणे ऑफलाईन

शहरातील मोठी शाळा असलेल्या विद्यावर्धक मंडळ संचलीत श्री शांतादुर्गा विद्यालयात (Sri Shantadurga Vidyalaya) लवकरच सर्व वर्गांना प्रत्यक्ष सुरवात होण्याचे संकेत मिळाले आहेत.
'शांतादुर्गा विद्यालय' सोमवारपासून पूर्णपणे ऑफलाईन
SchoolDainik Gomantak

डिचोली: शहरातील (Bicholim) मोठी शाळा असलेल्या विद्यावर्धक मंडळ संचलीत श्री शांतादुर्गा विद्यालयात (Sri Shantadurga Vidyalaya) लवकरच सर्व वर्गांना प्रत्यक्ष सुरवात होण्याचे संकेत मिळाले आहेत. शाळांबाबतीत सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता येत्या सोमवारपासून इयत्ता पहिलीपासून अद्याप ऑफलाईन (Offline) न झालेले सहावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय व्यवस्थापन मंडळाने घेतला आहे. या शाळेत इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ऑफलाईन करण्याचा निर्णय यशस्वी होतानाच, या वर्गांना मिळणाऱ्या प्रतिसादानंतर आता इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतचे ऑफलाईन वर्ग घेण्याच्या निर्णयाप्रत व्यवस्थापन मंडळ आले आहे. पालकांच्या सहमतीने आणि एसओपी पाळून येत्या सोमवारपासून इयत्ता पहिलीपासून ऑफलाईन वर्गाना सुरवात होणार आहे. शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने त्यादृष्टीने तयारी केली असून, शिक्षण खात्यालाही तशी कल्पना दिल्याची माहिती मिळाली आहे.

एसओपी पाळून शाळा सुरु करण्याची शिफारस 'कोविड' विषयक कृती दलाने केली असली, तरी सरकारने त्याबाबतीत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. संबंधित घटकांशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून इयत्ता आठवीपर्यंतचे वर्ग सुरु होणार की नाही, त्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र पालकांचा आग्रह आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इयत्ता पहिलीपासून ऑफलाईन वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे शांतादुर्गा परिवार संस्थेचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी सांगितले.

School
गोवा पर्यटन विभागाकडून स्थानिक व्यावसायिकांना दिलासा

ऑफलाईन वर्ग सुरळीत

शिक्षण खात्याच्या परिपत्रकानुसार गेल्या महिन्याच्या 18 तारखेपासून बहूतेक शाळांनी नववी आणि दहावीचे ऑफलाईन वर्ग सुरु झाले आहेत. मात्र शांतादुर्गा विद्यालयात त्यापुर्वीच नववी आणि दहावीचे ऑफलाईन वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या वर्गांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळल्यानंतर इयत्ता आठवी आणि नंतर सातवीचे ऑफलाईन वर्ग सुरु करण्यात आले. दिवाळीच्या सुटीनंतर बुधवारपासून पुन्हा वर्ग सुरु झाले आहेत.

एसओपीचे पालन

विद्यार्थ्यांची मोठी पटसंख्या त्यातच एसओपीचे पालन त्यामुळे माध्यमिक शाळेत नववी आणि दहावी वगळता अन्य वर्ग एकाच दिवशी भरविणे शक्य नाही. त्यामुळे आठवीपर्यंतचे वर्ग एक-एक दिवसांचे अंतर सोडून भरविण्यात येणार आहेत. सध्याच्याप्रमाणेच एसओपीचे पालनही करण्यात येणार आहे. आवश्यक ती खबरदारीही घेण्यात येणार आहे. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी पूर्ण लसीकरण केलेले आहे.

-विजय सरदेसाई, अध्यक्ष, श्री शांतादुर्गा परिवार, डिचोली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com