Devdasi ..तर त्या स्‍त्रियांचे शोषण थांबेल!

‘अर्ज’च्या शिष्टमंडळाचे संबंधित विभागांना निवेदन सादर
Devdasi
Devdasi Dainik Gomantak

Devadasi in Goa: कर्नाटक बाहेरील देवदासींना गृहकर्ज, वसतिगृह सुविधा, शेतजमीन खरेदीसाठी निधी, विवाह भत्ता आणि इतर भत्ते यांसारखे विविध लाभ देण्याची विनंती अर्जच्या शिष्टमंडळाने कर्नाटकातील विविध सरकारी विभागांना निवेदन सादर केले आहे.

Devdasi
Babush Monserrat Rape Case: पीडितेच्‍या फेरसाक्षीच्‍या अर्जावर उद्या युक्तिवाद

अर्ज या एनजीओचे प्रमुख अरुण पांडे म्हणाले, मार्च २०२३ मध्ये, ‘अर्ज’ ने गोव्यातील देवदासींचे सर्वेक्षण करून त्यांना कर्नाटक सरकारने देवदासींसाठी जाहीर केलेल्या सरकारी योजनांचा लाभ मिळावा, प्रयत्न केले. सर्वेक्षणादरम्यान ‘अर्ज’ने विजापूर-कर्नाटक येथील २३ देवदासींची ओळख पटवली. या देवदासींना केडीपी कायदा, १९८४ अंतर्गत कोणतेही लाभ मिळालेले नसल्याचे आढळून आले.

Devdasi
इस्‍कॉन : बोरी गावात वादळापूर्वीची शांतता!

कर्नाटक सरकारने देवदासींसाठी जाहीर केलेल्या देवदासी योजना - पेन्शन, गृहनिर्माण सबसिडी कर्जे, २० लाख रुपये शेतजमीन खरेदीसाठी, देवदासी मुलांच्या वसतिगृहाची सुविधा, शिष्यवृत्ती आणि विवाह भत्ता, या सर्व सवलती प्रत्येक देवदासी स्त्रीला मिळाल्या पाहिजेत,

जेणेकरून त्या देवदासी प्रथेच्या शोषणातून बाहेर येतील, असे मत पांडे यांनी व्यक्त केले. अर्जच्या शिष्टमंडळाने आत्तापर्यंत कर्नाटक राज्यातील, देवदासी पुनर्वसन मंडळ अधिकारी, महिला आणि बालकल्याण खाते, अनुसूचित जाती आणि जमाती खाते आणि समाजकल्याण खाते यांच्याकडे आपली निवेदन याचिका सादर केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com