Goa: अपहरण प्रकरणातील बाळासह चौघांची झाली डीएनए चाचणी

DNA.jpg
DNA.jpg

पणजी: बांबोळी गोमेकॉ इस्पितळातून (Goa Medical College) अपह्रत (Kidnapped) केलेल्या बाळासह त्याचे पालक (Parents) तसेच संशयित महिला विश्रांती गावस या चौघांची गोमेकॉ इस्पितळात ‘डीएनए’ चाचणी (DNA Test) करण्यात आली. या चाचणीच्या अहवालानंतर बाळाची आई कोण हे ठरणार आहे. न्यायालयात हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे ही चाचणी महत्त्वाची आहे. (All four including the abducted baby underwent DNA testing)

संशयित विश्रांती गावस ही आगशी पोलिस कोठडीत आहे. तिची जबानी नोंदवण्यात आली आहे. तिच्याशी संबंध आलेल्या इतर काही व्यक्तींच्या जबान्या तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फूटेज मिळवण्याचे काम पोलिस करीत आहेत. संशयिताने जामिनासाठी अजूनही अर्ज केला नाही. तिने जबानीत दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यात येत आहे. सध्या बाळाला मूळ मातेच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बाळाच्या पालकांना पोलिसांनी संपर्कात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बाळाची आई ही तक्रारदार तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने आरोपपत्र सादर होईपर्यंत आगशीतच राहण्यास सांगण्यात आले आहे.

‘त्या’ बाळासह चौघांची झाली डीएनए चाचणी                                           बांबोळी गोमेकॉ इस्पितळातून अपह्रत केलेल्या बाळासह त्याचे पालक तसेच संशयित महिला विश्रांती गावस या चौघांची गोमेकॉ इस्पितळात ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या अहवालानंतर बाळाची आई कोण हे ठरणार आहे. न्यायालयात हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे ही चाचणी महत्त्वाची आहे. 

संशयित विश्रांती गावस ही आगशी पोलिस कोठडीत आहे. तिची जबानी नोंदवण्यात आली आहे. तिच्याशी संबंध आलेल्या इतर काही व्यक्तींच्या जबान्या तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फूटेज मिळवण्याचे काम पोलिस करीत आहेत. संशयिताने जामिनासाठी अजूनही अर्ज केला नाही. तिने जबानीत दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यात येत आहे. सध्या बाळाला मूळ मातेच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बाळाच्या पालकांना पोलिसांनी संपर्कात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बाळाची आई ही तक्रारदार तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने आरोपपत्र सादर होईपर्यंत आगशीतच राहण्यास सांगण्यात आले आहे.

संशयिता हादरली 
या घटनेनंतर संशयित महिला पूर्णत: हादरलेली आहे. तिने केलेल्या या गुन्ह्यासाठी कमीत कमी तीन वर्षे तर जास्तीत जास्त दहा वर्षे शिक्षा होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com