जीवरक्षकांना गोवा मनुष्यबळ विकास महामंडाळात सामावून घेण्याच्या मागणीसाठी पर्यटन संचालक कार्यालयाला घेराव

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

गेल्यावर्षीच्या आंदोलनानंतर जीवरक्षकांना महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन गोवा पर्यटन विभागाने दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने जीवरक्षकांनी आज पर्यटन संचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत कार्यालयाला घेराव घातला. 

पणजी : गेल्यावर्षीच्या आंदोलनानंतर जीवरक्षकांना महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन गोवा पर्यटन विभागाने दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने जीवरक्षकांनी आज पर्यटन संचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत कार्यालयाला घेराव घातला. 

सरकारने आश्वासन दिल्यानुसार जीवरक्षकांना गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या सेवेत घ्यावे अशी मागणी जीवरक्षक करत आहेत. दृष्टी मरीन कंपनीकडे गोव्यातील किनाऱ्यांवर जीवरक्षक पुरवण्याचे कंत्राट आहे. या कंपनीच्या कंत्राटी जीवरक्षकांना पुरेशा साधन सुविधा उपलब्ध नसताना जीवाची पर्वा न करता काम करावे लागते. यासाठी गेल्यावर्षीदेखील आंदोलने करणअयात आली होती, परंतु परिस्थिती सुधारण्याकरिता काहीच प्रयत्न केले गेले नाहीत.

गोव्यातील किनाऱ्यांवर पर्यटकांना काही गरज पडल्यास, दुखापत झाल्यास त्यांना मदत करण्यासाठी हे जीवरक्षक कायम तैनात असतात. गेल्या काही दिवसात गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावरील जेली फिश ने पर्यटकांना दंश करण्याच्या घटनेत वाढ झाली होता, तेव्हादेखील या जीवरक्षकांकडून पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात आली.

अधिक वाचा : 

गोव्याला इंडिया टुडे चा बेस्ट परफॉरमिंग स्टेट पुरस्कार जाहीर..

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘अपॉईंटमेंट घेऊनच तपासणीसाठी यावे’

राज्यात पावसाची शक्यता

 

 

संबंधित बातम्या