Kadamba Bus Services: गोवा ते केरळ दरम्यान कदंब बससेवा सुरू करा, कोणी केलीय ही मागणी?

केरळला जाण्यासाठी बससेवा नसल्याने अनेकांना आर्थिक फटका बसत आहे. कदंब बससेवा सामान्य लोकांना परवडणारी आहे.
Goa To Kerala Kadamba Bus
Goa To Kerala Kadamba BusDainik Gomantak

Goa To Kerala Kadamba Bus: पर्यटन राज्य म्हणून गोव्याची जशी देशात ओळख आहे तशीच ती परदेशात देखील आहे. याशिवाय भारतातील अनेक राज्यांची पर्यटन राज्य म्हणून ओळख आहे. यामध्ये केरळ देखील एक राज्य आहे.

त्यामुळे गोवा ते केरळ अशी कदंब बससेवा (Kadamba Transport Corporation) सुरू केली जावी अशी मागणी केली जात आहे. याबाबतचे एक निवेदन कदंब महामंडळाला देण्यात आले आहे.

ऑल गोवा सॉलिडरीटी पीपल्स संघटनेच्या (All Goa Solidarity peoples) वतीने गोवा ते केरळ (Goa To Kerala Bus) मार्गावर बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

गोव्यात तसे केरळचे लोक येतात तसेच पर्यटनासाठी केरळमध्ये देखील जाणारे पर्यटक अनेक आहेत. या लोकांसाठी या मार्गावर बससेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आलीय.

केरळला जाण्यासाठी बससेवा नसल्याने अनेकांना आर्थिक फटका बसत आहे. कदंब बससेवा सामान्य लोकांना परवडणारी आहे. पर्यटन हंगाम (Tourism) सुरू असल्याने खासगी वाहनचालक भरसाठ भाडे अकारून पर्यटकांची लयलूट करतात. त्यामुळे केरळ बससेवा फायदेशीर ठरेल असे या निवेदनात म्हटले आहे.

ऑल गोवा सॉलिडरीटी पीपल्स संघटनेचे सल्लागार आणि कार्यकर्ते यांनी कदंब महामंडळाचे चेअरमन तथा आमदार उल्हास तुयेकर यांची भेट घेऊन बससेवे बाबत निवेदन सादर केले.

गोवा ते केरळ बसमार्गावर (Goa To Kerala Kadamba Bus Service) बससेवा सुरू केल्यावर त्याचा फायदा सामान्य नागरिकांना होईल असे या संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com