''सर्व पालिका आणि महापालिका निवडणूक एकत्र घ्याव्यात''

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली जात नसली तरी पक्ष पुरस्कृत उमेदवार रिंगणात उतरवले गेले आहेत.

पणजी : राज्य निवडणूक आयोगाने सात पालिका आणि एका महापालिकेचा निकाल जाहीर करणे पुढे ढकलावे किंवा सर्व पालिका व महापालिका निवडणूक एकत्र घ्यावी अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केली. ते म्हणाले 20 मार्च रोजी सात पालिका क्षेत्रात मतदान आहे आणि 22 रोजी निकाल आहे.

इतर पाच पालिका क्षेत्रातील मतदानाची निकालाची तारीख अद्याप ठरायची आहे. सात पालिका क्षेत्रातील निकाल आधी जाहीर केला तर त्याचा प्रभाव उर्वरित पालिका क्षेत्रातील निकालावर पडू शकतो. ही निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली जात नसली तरी पक्ष पुरस्कृत उमेदवार रिंगणात उतरवले गेले आहेत. सत्ताधारी भाजपने तर तशी जाहिरातबाजीही केलेली आहे.

गोव्यातील त्या दहा आमदारांना अपात्र न ठरवल्यास चोडणकर पुन्हा सर्वोच्च...

मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सर्व नेते आमचेच उमेदवार निवडून येतील असे  छातीठोकपणे सांगत आहेत. यामुळे राजकीय पक्षांची चिन्हे या निवडणुकीत नसली तरी ही निवडणूक पक्षीय पातळीवरच अप्रत्यक्षपणे लढवली जात आहे. यामुळे 22 मार्च रोजी सात पालिका क्षेत्रांचा निकाल जाहीर येऊ नये सर्व सर्व पालिका क्षेत्रात एकाच वेळी निवडणूक घेण्यात यावी किंवा सर्व पालिकांचा निकाल एकाच वेळी जाहीर करण्यात यावा.

संबंधित बातम्या