Goa Tourism: गोव्यात लेट नाईट पार्टी आणि मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी द्या- सरकारचे केंद्राला पत्र

पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारचे प्रयत्न
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

Goa Tourism: पर्यटन उद्योग हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि स्थानिक लोकांसाठी उपजीविकेचा मुख्य स्त्रोत देखील आहे. लग्न, संमेलने, कार्यक्रमासाठी पर्यटकांची गोव्याला पसंती असते. त्यामुळे साहजिकच गोव्यात रात्री उशिरा उत्सव, पार्ट्यांचे आयोजन केले जाते.

या पार्ट्यांसाठी ध्वनी प्रदूषण नियमांमध्ये शिथिलता आणावी या मागणीसाठी गोवा सरकारने केंद्राला पत्र लिहून ध्वनिप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण नियम), 2000 अंतर्गत शिथिलता मागितली आहे.

ज्यामुळे पर्यटन उद्योगाला चालना मिळून रात्री उशिरा पार्ट्या आणि उत्सवांना परवानगी देता येईल.

राज्याचे पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी 4 जानेवारी रोजी केंद्रीय वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून ध्वनी प्रदूषण, कायद्याअंतर्गत शिथिलता मागितली.

बुधवारी विधानसभेत असे म्हटले की राज्याने आता मागणी केली आहे की 'गोव्याच्या किनारी भागांना स्वतंत्र वर्गीकरण करून तसेच दिवस आणि रात्रीच्या वेळ ठरवून ठेवणे आवश्यक आहे.

प्रत्येक गावात किंवा नगरपालिकेत वार्षिक जत्रा किंवा संगीत पार्टीच्या दिवशी रात्री 10 ते मध्यरात्री 12 दरम्यान लाऊड स्पीकर वापरण्याची परवानगी देणारी नवीन तरतूद समाविष्ट केली जाईल.

Goa Tourism
Manohar International Airport: ‘मोपा’वर ‘ब्ल्यू कॅप टॅक्सी स्टॅंड’चे आश्वासन हवेतच

"काब्राल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे कि वर्षभरात केवळ 15 दिवस मध्यरात्रीपर्यंत (12वाजेपर्यंत) संगीत वाजविण्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही. परंतु वेगवेगळ्या ठिकाणच्या जत्रा, उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी परवानग्या घ्यावा लागतात.

अशा परवानग्या घ्यावा लागू नयेत याकरिता कायद्यात काही बदल करावे लागतील. त्याचबरोबर केंद्राकडून वेळ वाढवून घेण्याचेही प्रयत्न केले जातील, असे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री नीलेश काब्राल यांनी लेखी उत्तर दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com