मद्यालये सुरू करण्यास मुभा द्या

Sudesh Arlekar
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

सरकारने लोकांना खाद्यजिन्नस सहज उपलब्ध व्हावेत तसेच संबंधित व्यवसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटावा यासाठी उपाहारगृहे सु्रू करण्यास परवानगी दिली आहे; मात्र, मद्यालये सुरू करण्यासंदर्भातील मागणी अजूनही दीर्घ काळ प्रलंबित आहे.

म्हापसा,  : ‘कोविड १९’मुळे गोव्यातील मद्यालये बंद असल्याने बारमालकांना मोठे नुकसान झाल्याचे नमूद करून, ही मद्या‍लये पुन्हा सुरू करण्या सरकारने मुभा द्यावी, अशी मागणी म्हापसा येथील बारमालक रमेश नाईक यांनी केली आहे.
श्री. नाईक मद्यालय मालकांच्यावतीने बोलताना म्हणाले, सरकारने लोकांना खाद्यजिन्नस सहज उपलब्ध व्हावेत तसेच संबंधित व्यवसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटावा यासाठी उपाहारगृहे सु्रू करण्यास परवानगी दिली आहे; मात्र, मद्यालये सुरू करण्यासंदर्भातील मागणी अजूनही दीर्घ काळ प्रलंबित आहे.
मद्यालये चालवण्यासाठी संबंधित मालकांनी अबकारी कराचा भरणा केलेला आहे. सरकारने तो कर रद्द केला असता तर मद्यालयांच्या मालकांना थोडाफार आर्थिक दिलासा मिळाला असता, असेही श्री. नाईक म्हणाले.
गोव्यातील मद्यालये त्वरित सुरू करण्यासाठीचे निवेदन बार ॲण्ड रेस्टॉरंण्ट असोसिएशनने यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे. मद्यालयांवर अवलंबून असलेल्या पर्यटन व्यवसायाशी निगडित अन्य विविध व्यवसायांनाही सध्या खीळ बसलेली आहे, असे नमूद करून गोव्याच्या पर्यटन व्यवसावर या एकंदर परिस्थितीचा मोठा परिणाम होणार आहे, असा दावाही रमेश नाईक यांनी केला.

संबंधित बातम्या