कोरोनाबाधित रुग्णांना गृह अलगीकरणास मुभा दिल्याने कुटुंबांसमोर पेच

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

सरकारने मार्गदर्शक सूचनांमध्ये काही बदल करताना कोरोनाबाधित असलेल्या ज्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत, त्यांना घरात स्वतःला अलगीकरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठीचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून घेणे सक्तीचे केले आहे.

पणजी: कोरोनाबाधित रुग्णांना सरकारने मार्गदर्शक सूचनांमध्ये गृह अलगीकरणात राहण्यास मुभा दिली आहे.  मात्र, गणेशचतुर्थी काळात या अलगीकरणामुळे घराबाहेर पडता येणार नाही. गणेशमूर्ती तसेच सामान कोण आणून देणार, अशी समस्या त्यांच्यासमोर आहे. संबंधित क्षेत्रातील प्रभाग नगरसेवक किंवा पंचसदस्यांना जबाबदारी सोपविण्यात आली, तरी प्रतिसाद मिळत नसल्यामुळे गृह अलगीकरण झालेल्या कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण परसले आहे. 

सरकारने मार्गदर्शक सूचनांमध्ये काही बदल करताना कोरोनाबाधित असलेल्या ज्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत, त्यांना घरात स्वतःला अलगीकरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठीचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून घेणे सक्तीचे केले आहे.

गृह अलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण अनेकजण आहेत. मात्र, त्यांच्या परिसरातील नगरसेवक किंवा पंचसदस्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा या रुग्णांना अनुभव येत आहे. त्यामुळे गणेशचतुर्थीचा सण ऐन तोंडावर आल्याने तो कसा साजरा करायचा, याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहेत. गृह अलगीकरणातील कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढे येण्यास प्रत्येकजण स्वतःला कोरोनाचा संसर्ग होईल, यासाठी घाबरत असल्‍याची माहिती एका कुटुंबाने दिली.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या