Goa Monsoon Update: पणजीत अर्धा तास मुसळधार

आज गोव्यात पावसाचा कोणताही अलर्ट नसला तरी समुद्र मात्र खवळलेलाच असेल.
Goa Monsoon Update: पणजीत अर्धा तास मुसळधार
Goa Monsoon UpdateDainik Gomantak

पणजी: काल बुधवारी राज्याला (Goa) पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अवघ्या चार तासांत 1.6 इंच पावसाची (Rain Updates) नोंद झाली. सकाळच्या प्रहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पणजी शहर तर अक्षरशः अर्धा दिवस तुंबले होते. राज्यभरात मध्‍यरात्रीपासून बेफाम पाऊस झाला असताना सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. आज गुरुवारी पावसाचा कोणताही अलर्ट नसला तरी समुद्र मात्र खवळलेलाच असेल.

Goa Monsoon Update
Goa: सावर्डे दुपदरी रेल्वे मार्गास सुरक्षा मंडळाकडून हिरवा कंदील

बुधवारी पहाटे सुरू झालेल्‍या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. फोंडा, साखळी, मडगाव, म्हापसा, वाळपई या भागाला पावसाने अक्षरशः झोडपले.

Goa Monsoon Update
Goa: मये पंचायत क्षेत्रातील हातुर्ली-तिखाजन रस्ता बनला खड्डेमय

राज्यात गुरुवारपासून पाऊस ब्रेक घेणार आहे. अरबी समुद्रात घोंघावणारे गुलाब वादळ गुजरातच्या दिशेने वळले आहे. त्यामुळे राज्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. पण, एक ऑक्टोबरपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात होणार आहे.

‘गुलाब’ वादळाचा राज्यावर परिणाम होणार नाही. वादळ सध्या गुजरातमध्ये पोहचले आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरवात होणार असून याकाळात अचानक वादळी वारे, वीजांचा कडकडाट होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

- एम.राहूल, संचालकहवामान वेधशाळा पणजी

Related Stories

No stories found.