काँग्रेसच्या नव्या आमदारांची कामगिरी परिपक्व!

अमरनाथ पणजीकर : विधानसभा अधिवेशनात मांडले लोकांचे प्रश्‍न
Amarnath Panajikar
Amarnath PanajikarDainik Gomantak

पणजी : नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनातील परिपक्व कामगिरीबद्दल गोमंतकीय जनतेकडून काँग्रेसच्या नवीन आमदारांचे कौतुक होत आहे. ही गोष्ट त्यांच्यासाठी आणि पक्षासाठी अभिमानाची आहे. अधिवेशनात त्यांनी केलेल्या कामगिरीचा पक्षालाही आनंद आहे. आमचे सर्व आमदार यापुढेही लोकांचा आवाज बनून काम करतील, असा आम्हाला पूर्ण विश्‍वास आहे, असे मत काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या नवीन आमदार संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, ॲड. कार्लुस फेरेरा, रुडॉल्फ फर्नांडिस यांनी त्यांच्या मतदारसंघातील, तसेच राज्याशी संबंधित अनेक मुद्दे प्रभावीपणे विधानसभेत मांडले. युरी आलेमाव यांनी मांडलेला कुंकळ्ळी लढ्यावरील खासगी सदस्य ठराव विधानसभेने एकमताने स्वीकारला. विधवा भेदभाव या विषयावरील त्यांची लक्षवेधी सूचना सभापतींनी शून्य प्रहरात विचारात घेतली. राज्यातील महिला संघटनांसह इतर लोकांनी त्यांची पाट थोपटली आहे. तर, आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी तीनरेषीय प्रकल्प रद्द करणे आणि आंदोलकांवरील खटले मागे घेण्याची मागणी करणारा खासगी सदस्य ठराव मांडला होता. त्यांच्या ठरावाने जनतेला गोव्याचे रक्षण करणारे आमदार दिसले, असे पणजीकर म्हणाले.

Amarnath Panajikar
Revolutionary Goans : राज्य सरकारकडून गोमंतकीय युवकांची फसवणूक

फर्नांडिस यांनी जुने गोवे येथील वारसा स्थळावरील बेकायदेशीर बांधकाम, चिंबल जंक्शन येथे उड्डाण पुलाच्या बांधकामाला होणारा विलंब आदी प्रश्‍न उपस्थित करत चोख भूमिका बजावली. मी खड्ड्यांनी भरलेल्या अटल सेतूवर ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो, अशा हजरजबाबी उत्तराने फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांचीही बोलती बंद केली, असेही पणजीकर यांनी सांगितले.

आमचे आमदार राष्ट्रपती निवडणूक आणि उपसभापती निवडीवेळीही ते संघटित असल्याचे दिसले. काँग्रेसमुळे भाजपच्या ‘ए’, ‘बी’ टीमचा पर्दाफाश झाला. ज्या आमदारांनी भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला मतदान केले, तेच उपसभापती निवडणुकीवेळी विरोधात राहिले नाहीत, असे पणजीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com