Tourist Trade Act: बेकायदेशीर व्यायवसायिकांना बसणार चाप; प्रसंगी पाणी, वीज...

पर्यटन व्यापार कायदा 14 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे
Hotel Silver Sand
Hotel Silver SandDainik Gomantak

गोवा सरकारने राज्यातील पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील हॉटेल्स, तसेच पर्यटन संबधीत व्यावसायिकांकडून बेकायदेशीर पैसे आकारणी होऊ नये यासाठी ही प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच भाग गोवा सरकारने पर्यटक व्यापार कायदा, 2022 ची 14 नोव्हेंबर 2022 पासून अंमबजावणी करण्यात येणार आहे. यासंबंधीची अधिसूचना सरकारने आज जारी केली.

(Amended Registration of Tourist Trade Act to come into force for Nov 14)

Hotel Silver Sand
Goa Captain of Ports Department: बेकायदेशीर रेती उपसाविरोधात कारवाई तीव्र

पर्यटक व्यापार कायदा नव्या दुरुस्तीनुसार (Registration of Tourist Trade Act ) व्यापारी, हॉटेल, ट्रॅव्हल यांनी गोवा सरकारकडे आपल्या व्यवसायाची नोंदणी करावी लागणार आहे. ती केली नसल्यास तसेच बेकायदेशीरपणे व्यवसाय चालवल्याचे आढळल्यास अशा व्यावसायिकांना आता अर्थिक दंड होणार आहे.

Hotel Silver Sand
Mhadei: म्हादई नदीवरील प्रकल्पासाठी कर्नाटक आग्रही, केंद्राकडे मंत्र्यांच्या पायघड्या

कारवाईचा भाग म्हणून प्रसंगी पाणी आणि वीज जोडणी देखील बंद केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारवाई करण्यापुर्वी प्राधिकरण अशा व्यावसायिकांना नोटीस बजावणार आहे. व त्यानंतर कारवाईचा बडगा उगारणार आहे. त्यामूळे पर्यटन प्राधिकरण पर्यटक व्यापार कायदा, 2022 ची कडक अंमली बजावणी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com