'राणेंचं राजकारण सुडाचं; मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा'

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांची मागणी; विश्वजीत राणेंकडूनही पाटकरांचा खरपूस समाचार
'राणेंचं राजकारण सुडाचं; मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा'
Amit Patkar allegation on Vishwajit RaneDainik Gomantak

पणजी : मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून सुरू असलेल्या सुडाच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. ओडीपी, पीडीए चुकीचे म्हणणार्‍या राणेंनी ते तयार केलेल्या अधिकार्‍यांविरोधात तक्रार का दाखल केली नाही? असा सवालही त्यांनी विचारला आहे. (Amit Patkar allegation on Vishwajit Rane)

यासोबतच केवळ विरोधकांना 'टार्गेट' करून त्यांच्यात भीती निर्माण करण्याचे प्रयत्न राणेंकडून सुरू आहेत, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी लगावला आहे. मंत्री विश्वजीत राणे यांना गोव्याची काळजी होती तर वाघेरी प्रश्नी ते का गप्प बसले? मिका सिंगबाबत स्वतंत्र पत्रकार परिषद का घेतली नाही? असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. विश्वजीत राणे यांनी नुकतेच मायकल लोबोंच्या दोन रिसॉर्टना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर दोघांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आता याच वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही उडी टाकली आहे.

Amit Patkar allegation on Vishwajit Rane
'त्या' युक्रेनियन नागरिकाचा मृत्यू नैसर्गिक; शवविच्छेदनानंतर झाले स्पष्ट

दरम्यान विश्वजीत राणेंनीही अमित पाटकरांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. कधीही पंच, आमदार न झालेल्या अमित पाटकर यांनी यांनी काँग्रेस विकत घेतला आहे. त्यांनी मला शिकवण्याची गरज नाही, असं शरसंधान राणेंनी पाटकरांवर सोडलं आहे. तसंच मायकल लोबो यांची कर्म विधानसभेत बाहेर पडणारच, असं म्हणत मंत्री विश्वजीत राणेंनी आपली निशाणेबाजी सुरुच ठेवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com