केंद्राकडून सुडाचे राजकारण लोकशाहीला बाधक : पाटकर
Amit Patkar Dainik Gomantak

केंद्राकडून सुडाचे राजकारण लोकशाहीला बाधक : पाटकर

पाटकर म्हणाले, राहुल गांधी यांना नॅशन हेराल्ड प्रकरणात कोणतेही कारण नसताना लक्ष्य केले जात आहे.

पणजी : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची सतावणूक सुरू असून, केंद्रातील भाजप सरकारकडून केवळ आणि केवळ सुडाचे राजकारण खेळले जात आहे. ही सूडबुद्धी लोकशाहीसाठी घातक आहे, अशी भीती गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

Amit Patkar
रेल्वे मार्ग विस्ताराबाबत जुलैमध्ये खटला सुरू

पत्रकार परिषदेला पक्षाचे प्रवक्ते कॅ. विरियातो फर्नांडिस, महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक, युवा काँग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, पक्षाचे नेते ॲड. श्रीनिवास खलप उपस्थित होते.

पाटकर म्हणाले, राहुल गांधी यांना नॅशन हेराल्ड प्रकरणात कोणतेही कारण नसताना लक्ष्य केले जात आहे. काँग्रेस सरकारने एका वृत्तपत्राच्या पत्रकारांना मदत व्हावी यासाठी ९० कोटी रुपयांची मदत केली होती. या वृत्तपत्राने देशाच्या स्वतंत्र्य संग्रामात योगदान केले असून त्यासाठी आर्थिक मदत केली होती, असे पाटकर पुढे म्हणाले.

Amit Patkar
‘पर्यटकच सांगतात टॅक्‍सींना डिजिटल मीटर नकोत’

राहुल गांधी यांची केंद्र सरकारकडून सतवणूक सुरू झाल्यामुळे याच्या निषेधार्थ दोनापावल येथील राजभवनासमोर गुरुवारी (ता. 16) आंदोलन करण्यात येणार आहे. देशातील सर्व राजभवनासमोर कॉंग्रेस कार्यकर्ते आंदोलन करून केंद्राच्या या कृतीचा निषेध करणार आहेत. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितली असल्याची माहितीही अमित पाटकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com