Amit Patkar Slams BJP: सनातन हिंदू धर्माबाबत मुख्यमंत्र्यांचे विधान आक्षेपार्ह! भाजपमुळेच समाजात द्वेष

अमित पाटकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा विरोध केला आहे
Amit Patkar Slams BJP Government
Amit Patkar Slams BJP GovernmentDainik Gomantak

Amit Patkar Slams BJP Government: गोव्यातून पोर्तुगिजांच्या खुणा पुसल्या पाहिजेत असे म्हणणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीची तुलना पोर्तुगिजांशी केली. मध्यप्रदेशातील इंदूर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी असे वक्तव्य केले होते.

सनातन हिंदू धर्म संपवण्याचा या आघाडीचा कट आहे, तसाच कट पोर्तुगिजांनीही गोव्यात रचला होता, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावरून गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

Amit Patkar Slams BJP Government
Goa Flight Rate Increased: गांधी जयंतीच्या लॉंग वीकेंडला गोव्यात येताय? मग विमान प्रवासाचे दर एकदा वाचाच

अमित पाटकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा विरोध केला आहे. मुख्यमंत्री सावंतांना भाजप पक्षश्रेष्ठींनी अशी विधाने करण्याचा आदेश दिला आहे का? असा परखड सवाल पाटकरांनी केला आहे.

खरंतर, भाजप सरकारच अशी विधाने करून समाजात द्वेष निर्माण करून सलोखा बिघडवण्याचे काम करत आहे.

कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनीही मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला आहे. हिंदू धर्म ही कोणत्याही एका राजकीय पक्षाची, नेत्याची जहागीर अथवा खासगी मालमत्ता नाही.

हिंदू हा सनातन धर्म आहे, जो आम्हीही आमच्या खासगी जीवनात तितक्याच तन्मयतेने पाळतो. आमच्याही दैनंदिन जीवनात देव, धर्म, व्रतवैकल्ये आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com