निवडणुकीच्या तोंडावर रणनिती ठरविण्यासाठी अमित शहा गोवा दौऱ्यावर

येणाऱ्या 14 आणि 15 ऑक्टोबरला अमित शहा (Amit Shah) गोव्यात (Goa) असतील. तर त्या आधी 13 ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गोव्यात येतील.
भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) हे गोवा दौऱ्यावर येणार आहेत.
भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) हे गोवा दौऱ्यावर येणार आहेत.Dainik Gomantak

गोव्यात (Goa) काँग्रेस (Congress), तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress), आम आदमी पार्टी, मागो, गोवा फॉरर्वड, शिवसेना यांच्यासह सर्व पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. युत्या, आघाड्या यांच्या बातम्यांची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. निवडणुकीत (Election) अगोदर गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) चे प्रमुख विजय सरदेसाई(Vijai Sardesai) यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांचा GFP पक्ष सत्ताधारी भाजपचा (BJP) सामना करण्यासाठी इतर राजकीय पंक्षाशी युती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यात आता सत्ताधारी भाजपने देखील आपली तयारी सुरु केली आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गोव्याच्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी गोव्याचा दौरा देखील केला होता. त्यानंतर आता स्वत: भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) हे गोवा दौऱ्यावर येणार आहेत.

भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) हे गोवा दौऱ्यावर येणार आहेत.
Goa: भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे आज गोव्यात आगमन झाले

या दौऱ्यात अमित शहा हे आढावा घेणार आहेत. येणाऱ्या 14 आणि 15 ऑक्टोबरला अमित शहा गोव्यात असतील. तर त्या आधी 13 ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस गोव्यात येतील. तेथे फडणवीस संपूर्ण आढावा घेतील आणि 14 तारखेला अमित शहा यांच्यासोबत गोव्यात बैठक होईल. त्यानंतर 15 ऑक्टोबरला फडणवीस दसऱ्याच्या कार्यक्रमासाठी पुन्हा नागपूरात येणार आहेत. तर अमित शहा हे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह प्रमुख नेत्यांशी चर्चा करुन 15 ऑक्टोबरला पुन्हा दिल्लीकडे रवाना होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com