Mahadayi Water Dispute: म्हादई विषयी अमित शहांच्या वक्तव्याचे गोव्यातील ग्रामसभांमध्ये पडसाद

राज्यातील ग्रामसभांमध्ये शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला
amit shah on Mahadayi
amit shah on Mahadayi Dainik Gomantak

Mahadayi Water Dispute: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादई विषयी हुबळीतील सभेत एक अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक विधान केले होते. या वक्तव्यावरून राज्यभर संतापाची भावना पसरली आहे. दरम्यान या विधानाचे पडसाद आज राज्यातील ग्रामसभांमध्ये उमटले. यावेळी शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

amit shah on Mahadayi
Mahadayi Water Dispute: हो! म्हादईचे पाणी वळवून भाजप सरकारने कर्नाटकच्या शेतकऱ्यांना न्याय दिला : गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादई विषयी केलेल्या विधानाचा पेडण्यातील कोरगाव ग्रामसभेत निषेध करण्यात आला. यावेळी म्हादई कर्नाटकात वळवण्यास विरोध करणारा ठराव ग्रामसभेने मंजूर केला आहे. हा ठराव मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सादर करण्यात येणार आहे तसेच हा ठराव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही सादर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कर्नाटकच्या म्हादईवरील प्रकल्पांना विरोध करण्याचा केरी-सत्तरी पंचायतीने ठराव मंजूर केला. तसेच पंचायत क्षेत्रात म्हादईबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली.

amit shah on Mahadayi
Mahadayi Water Dispute: अमित शहांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण, म्हादईच्या...

केरी-सत्तरी पंचायतीने 'विधवा सन्मान' ठरावावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेतली. माधवी राणे व स्नेहा गवस यांनी 'विधवा सन्मान' ठराव मांडला. ग्रामसभेने गावातील विधवांना सन्मान देण्याचा ठराव मंजूर केला.

म्हादई विषयी शहा यांनी केलेल्या विधानाचा निषेधााचा ठराव कुर्टी ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा मये पंचायतीच्या ग्रामसभेत निषेध करण्यात आला व तसा ठरावही मंजूर करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com