चिखलीत रात्री अचानक झालेल्या वायूगळतीमुळे भीतीचे वातावरण

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

मुंबई - गोवा महामार्गालगत असलेल्या चिखली येथे काल रात्री कोल्ड स्टोरेज व आईस फॅक्टीरीमध्ये सिलिंडरमधून अमोनिया गॅसची गळती झाली.

चिखली :   मुंबई - गोवा महामार्गालगत असलेल्या चिखली येथे काल रात्री कोल्ड स्टोरेज व आईस फॅक्टीरीमध्ये सिलिंडरमधून अमोनिया गॅसची गळती झाली. रात्री उशीरा ही गळती झाल्याने चिखली गावात भीतीचे वातावरण पसरले होते.  या घटनेची माहिती ताबडतोब अग्निशमन दलाला तसेच पोलिसांना देण्यात आली. या गॅस गळती माहिती चिखली गावातील ग्रामस्थांना रात्रीच देऊन सतर्क करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन ही गळती बंद केली. ही गॅस गळती कशामुळे झाली याचा तपास सध्या सुरू आहे.

 

अधिक वाचा :

गोव्याला अन्नधान्य चळवळीत मदत करण्यासाठी  दुप्पट रेल्वे ट्रॅकला पाठींबा: एमजीपी

शिकार करण्यासाठी जंगलात गेलेल्याचीच झाली शिकार

संबंधित बातम्या