Goa Cricket Team:अमोघचे गोव्याच्या नेतृत्वपदी ‘पुनरागमन’

गतमोसमातील कर्णधार स्नेहल आता उपकर्णधार
Goa Cricket
Goa Cricket Dainik Gomantak

पणजी: गोव्याच्या क्रिकेट संघातील अनुभवी अष्टपैलू अमोघ देसाईने कर्णधारपदी पुनरागमन केले, गतमोसमात नेतृत्व केलेल्या स्नेहल कवठणकर याची तो जागा घेईल. तीस वर्षीय क्रिकेटपटू आगामी जे. पी. अत्रेय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत संघनायक असेल.

(Amogh Desai was selected as the captain of the Goa cricket team)

Goa Cricket
Ind vs Aus T20 series: भारत ऑस्ट्रेलिया T20 मालिकेची संपूर्ण माहिती

गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) सोमवारी अमोघच्या कर्णधारपदी नियुक्तीची माहिती दिली. स्नेहलने गतमोसमात विजय हजारे करंडक एकदिवसीय, तसेच रणजी करंडक स्पर्धेत गोव्याचे नेतृत्व केले होते, तो आता संघाचा उपकर्णधार असेल. अमोघने यापूर्वी 2018-19 मोसमात गोव्याचे सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20, तसेच विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत नेतृत्व केले होते.

Goa Cricket
'Friendship Moto Cup: आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे दोन रायडर्स होणार सहभागी

देशांतर्गत स्पर्धांसाठीही नेतृत्व शक्य

जे. पी. अत्रेय स्पर्धा मोहाली, तसेच पंजाब, चंडीगड, हरियानातील मैदानावर 22 सप्टेंबरपासून खेळली जाईल. सुधारित वेळापत्रकानुसार गोव्याचा पहिला सामना प्लेयर्स अकादमी दिल्लीविरुद्ध होईल, नंतर ते अनुक्रमे पेट्रोलियम क्रीडा मंडळ व पंजाब क्रिकेट क्लबविरुद्ध खेळतील.

या एकदिवसीय स्पर्धेसाठी अमोघची कर्णधारपदी निवड झाल्याने तो आगामी देशांतर्गत मोसमातही गोव्याचे नेतृत्व करण्याचे संकेत आहे. ऑक्टोबरमध्ये गोव्याचा संघ टी-20, तर नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय स्पर्धेत खेळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com