अमृतमोहोत्सव: नवभारत निर्माणकरीता प्रयत्न व्हावेत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

नवभारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने चळवळ उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या इतिहासाबद्दल, स्वातंत्र्यलढ्यात आणि बलिदान दिलेल्या महान नेत्यांविषयी या देशातील तरुणांना नेहमीच अभिमान असायला हवा

पणजी:  नवभारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने चळवळ उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या इतिहासाबद्दल, स्वातंत्र्यलढ्यात आणि बलिदान दिलेल्या महान नेत्यांविषयी या देशातील तरुणांना नेहमीच अभिमान असायला हवा, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ मेळाव्याचा शुभारंभ केल्यानंतर बोलताना केले.

माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे आयोजित या कार्यक्रमाला कार्यवाहक मुख्य सचिव कुणाल, पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा, माजी आमदार व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, भाजपचे प्रदेश सचिव (संघटन) सतीश धोंड, नेहरू युवा समन्वयक कालिदास घाटवळ, सचिव सी. प्रसाद, माहिती तंत्रज्ञान संचालक अंकिता आनंद, माहिती व प्रसिद्धी खात्याचे संयुक्त संचालक रमेश नाईक तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. ‘स्वातंत्र्य संघर्ष @ ७५’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपक्रम असून त्यामागील उद्देश तरुणांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणारा आहे. महोत्सवाला काही हायस्कूलचे निमंत्रित विद्यार्थी उपस्थित होते.

अपात्रतेच्या आदेशास विलंब करून सभापती सर्वोच्च न्यायालयाची खिल्ली उडवत आहेत: चोडणकर 

कार्यक्रमापूर्वी त्यांनी आझाद मैदानावरील स्वातंत्र्यसैनिकांच्या हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहिले. या महोत्सवाच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी हवेत फुगे सोडले तसेच कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सायकल रॅलीला झेंडा दाखवला. मुक्तिलढ्यातील चळवळ या संदर्भात आझाद मैदानावर आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन त्यांनी केले. यावेळी नागेश सरदेसाई व डॉ. वर्षा कामत यांनी स्वातंत्र्यलढ्यावरील तसेच या महोत्सवाचे महत्त्व याची माहिती दिली. माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक सुधीर केरकर यांनी स्वागत केले तर सहाय्यक माहिती अधिकारी श्‍याम गावकर यांनी सूत्रसंचालन केले.

c

संबंधित बातम्या