Emergency Power Shutdown: उत्तर गोव्यातील 'या' भागात रविवारी वीज पुरवठा असणार बंद; वाचा सविस्तर

तातडीच्या कारणात्सव हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं केलं स्पष्ट
Power shutdown
Power shutdownDainik Gomantak

उत्तर गोवा प्रशासनाने जिल्ह्यातील बहूतांशी वीज पुरवठा केंद्रे ही दुरुस्तीच्या कारणास्तव 20 नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहे. त्यामुळे या दिवशी विजेवर अवलंबून असणारी कामे प्रलंबित ठेवावी लागणार आहेत.

(An emergency power shutdown is arranged at Corlim Substation on 20 November )

Power shutdown
Goa Government: वाळपईच्या सरकारी आरोग्य केंद्रासमोर गतिरोधक उभारण्याची मागणी!

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर गोवा वीज विभागाने 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत खोर्ली औद्योगिक वसाहत, करमळी, जुने गोवा, नेवरा, रायबंदर, कुभांरजुवे ही मुख्य विज पुरवठा करणारी केंद्रे विजपुरवठा करणार नाहीत अशी माहिती दिली आहे. ही मुख्य पुरवठा केंद्रे पुरवठा निर्बंधित करणार असल्याने संबंधीत, गावे वाडा यांना विज पुरवठा होऊ शकणार नाही. केंद्रांची नावे ही मर्यादित असले तरी, पुरवठा होणारी गावे ही अंदाजे 100 पेक्षा अधिक आहेत.

Power shutdown
Goa Municipalities: पेडणे पालिका कामगारांचे काम बंद आंदोलन

विज पुरवठा बंद असण्याचे कारण देताना विजखात्याने तातडीच्या कारणात्सव हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे या भागातील नागरीक तसेच छोट्या -मोठ्या व्यावसायिकांना या वेळेत विज पुरवठा होऊ शकणार नाही. मात्र पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. कारण उरलेल्या वेळेत पाणी पुरवठा करणे विज पंपाना शक्य होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com