Goa Directorate of Agriculture: म्हापशात रविवारी ‘नाचणीचे फेस्त’

पहिलाच प्रयोग : कडधान्यांपासून बनविलेल्या पदार्थांचा घेता येणार आस्वाद
Agriculture
AgricultureDainik Gomantak

Goa Directorate of Agriculture एकेकाळी भारतीय स्वयंपाकाचा आहार असलेली ‘बाजरी’ ही अनेक वर्षांपासून पसंतीस उतरली आहे. बाजरीच्या वर्गात मोडणाऱ्या नाचणीचे उत्पादन गोव्यात घेतले जाते.

त्यामुळे गोवा कृषी संचालनालयाने यंदा ‘नाचणीचे फेस्त'' आयोजित करण्‍याचा निर्णय घेतला आहे. ‍येत्‍या रविवार, 12 रोजी म्हापसा येथे हे गोव्‍यातील पहिलेच ‘नाचणीचे फेस्त'' होईल, अशी माहिती कृषी संचालक नेव्हिल आफोन्सो यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे बाजरी पिकाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यास भारतानेही पाठिंबा दिल्याने गोवा सरकार हे ‘नाचणीचे फेस्त’ साजरे करीत आहे. हा पहिलाच कचरामुक्त कार्यक्रम असणार आहे.

राज्यात 20 हेक्टर क्षेत्र नाचणीच्या लागवडीखाली आहे. ते वाढविण्यावर कृषी खाते प्रयत्न करणार आहे. शिवाय नाचणीच्या आणि त्या वर्गातील उत्पादनांना चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्‍न करणार आहे, असे आफान्सो म्हणाले.

Agriculture
Ration Card: शिधापत्रिका पूर्ववत करण्यासाठी बार्देशातून 798 जणांकडून अर्ज

पत्रकार परिषदेला ‘आत्मा’चे राकेश किशोर भावे, ग्वेंडोलीन डी ओर्नेलास, पत्रकार प्रकाश कामत यांचीही उपस्थिती होती. भावे व ओर्नेलास यांनी बाजरी वर्गातील धान्यांची व नाचणीविषयी माहिती दिली.

नाचणीच्‍या महत्त्वाबाबत करणार जागृती

नाचणीचा खाद्य म्हणून वापर केल्यास लोकांच्या जीवनात त्‍यास किती महत्त्व आहे, याविषयी जागृती केली जाणार आहे.

हे फेस्त धुळेर-म्हापसा येथील फुटबॉल स्टेडियमजवळील कृषी खात्याच्या फार्ममध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत होईल. खाद्यपदार्थांचे पुनरुज्जीवन करणे, गोव्याची संस्कृती, समुदयाचे सक्षमीकरण, संगीत, खाद्यपदार्थांचे स्टॉल्‍स तेथे असतील, असे फेस्तकार मारियस फर्नांडिस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com