Ganesh Chaturthi : गोव्यात निर्माल्यापासून खतनिर्मितीचा अभिनव उपक्रम

भाविकांचा चांगला प्रतिसाद; म्हापसा रोटरॅक्ट क्लबतर्फे 22 ठिकाणी संकलन कलश
Ganesh Chaturthi Waste management
Ganesh Chaturthi Waste management Dainik Gomantak

Ganesh Chaturthi : गणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी निर्माल्य नदीत तसेच विहिरीत टाकले जाऊ नये, यासाठी निर्माल्य गोळा करण्यासाठी तार-म्हापसासहित विविध ठिकाणी 22 निर्माल्य कलश ठेवले आहेत. या कलशांमध्ये जमा होणारे निर्माल्य एकत्रित करून ते प्रकल्पात जवळपास 60 दिवस कंपोस्टसाठी ठेवण्यात येईल. नंतर त्यापासून खतनिर्मिती केली जाईल.

रोटरॅक्ट क्लब ऑफ म्हापसातर्फे यावर्षी पालिकेसोबत हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. तारीकडे, आकय, कुचेली, खोर्ली, काणका, पर्रा याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात 22 निर्माल्य कलशाची व्यवस्था केली आहे. काही वर्षांपासून म्हापसा पालिकेने तारीकडे विसर्जनस्थळी निर्माल्य कलश ठेवण्यास सुरवात केली होती. आता रोटरॅक्ट क्लबने निर्माल्य कलशाची जबाबदारी स्वीकारली आहे.

या कलशात निर्माल्य गोळा करून नंतर त्यापासून खत निर्मितीसाठी प्रक्रिया करण्यात येईल. विसर्जनाच्या दिवशी क्लबचे सदस्य विसर्जनस्थळी हजर राहतात. ते लोकांना निर्माल्य कलशात जमा करण्यास सांगतात. दीड दिवस, पाच दिवसांच्या विसर्जनावेळी लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला, असे क्लबचे अध्यक्ष बांदोडकर यांनी सांगितले.

Ganesh Chaturthi Waste management
Goa Ganesh Chaturthi 2022|लोटलीत चतुर्थी उत्सवात जातीय सलोख्याचे दर्शन

‘ग्रीन गणेशा गोवा’ उपक्रमाचा भाग

रोटरॅक्ट क्लब मागील पाच वर्षांपासून ‘ग्रीन गणेशा गोवा’ या उपक्रमांतर्गत चतुर्थी पर्यावरणपूरक असावी, यासाठी प्रयत्न करीत आहे. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ला प्रोत्साहन देऊ नये, यासाठी क्लब प्रयत्नशील आहे. जे मूर्तीकार या उपक्रमास हातभार लावतात, त्यांचा क्लबतर्फे सत्कार केला जातो. निर्माल्य कलश हाही त्याचाच एक भाग आहे. कोविडकाळात क्लबने कृत्रिम विसर्जन तलावाची व्यवस्था केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com