आणि... गोवा तब्बल साडेचारशे वर्षांनंतर पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

वर्ष 1510 मध्ये प्रथमच  पोर्तुगीजांनी  गोव्यावर ताबा मिळवला. त्यानंतर सुमारे 450 वर्षांपर्यंत त्यांनी येथे शासन केले.  मात्र 1 डिसेंबर 1961 रोजी अखेर गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. पण पोर्तुगीज गोवा सोडण्यासाठी इतक्या सहजा सहजी तयार नव्हते.

जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे गोवा. अथांग पसरलेला समुद्र, खळखळणाऱ्या लाटा, नाइटलाईफ, कसिनो याशिवाय निसर्ग सौंदर्याची खान म्हणजे गोवा.  लाखो पर्यटक दरवर्षी याठिकाणी जात असतात. पण स्वातंत्र्यानंतरही काही वर्षांपर्यंत गोवा हा भारताचा भाग नव्हता हे तुम्हाला माहीत आहे का, भारताला स्वातंत्र्य मिळल्यानंतरही तब्बल 14 वर्षे गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्याचा लढाही तितकाच  खूपच रोमांचक होता.  (And ... Goa was liberated from Portuguese slavery after four hundred and fifty years) 

PM pays tributes to Ram Manohar Lohia - News Vibes of India - Latest News  Update on Kashmir, Business and Energy

450 वर्षे गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता 
वर्ष 1510 मध्ये प्रथमच  पोर्तुगीजांनी  गोव्यावर ताबा मिळवला. त्यानंतर सुमारे 450 वर्षांपर्यंत त्यांनी येथे शासन केले.  मात्र 1 डिसेंबर 1961 रोजी अखेर गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. पण पोर्तुगीज गोवा सोडण्यासाठी इतक्या सहजा सहजी तयार नव्हते. मात्र भारतानेही गोवा मुक्ती कठोर भूमिका घेतल्यानंतरच पोर्तुगीज गोवा सोडण्यासाठी तयार झाले. भारताने  स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीजांकडे गोवा मुक्तीची मागणी केली. पान पोर्तुगीजांनी भारतीयांची मागणी धुडकावून लावली.  आता गोवा परत मिळवण्यासाठी भरतीयांकडे दोनच मार्ग होते. पहिलं म्हणजे युद्ध आणि दूसरा म्हणजे सत्याग्रह. अशा कठीण प्रसंगी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि म. गांधी यांनी दुसऱ्या मार्गाने गोवा मिळवण्याचा निश्चय केला. 

Kamat Research Database - Goa's Freedom Struggle

खरंतर, देशाला स्वातंत्र्य मिळूनदेखील गोमंतकीय मात्र पारतंत्र्यात होते.  गोमंतकीय अत्यंत हलखीच्या परिस्थितीत जगत होते. यामुळे जनमानसात रोष होता. अशाताच पोर्तुगीजांच्या विळख्यातून  गोवा मुक्त करण्यासाठी असंख्य कार्यकर्ते भूमिगत पद्धतीने आपलं काम करत होते.  यात विशेष नाव घ्यावे लागेल ते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे. राम मनोहर लोहिया यांचा गोवा मुक्ती संग्रामात खूप मोठा वाटा आहे.  1946 मध्ये लोहिया त्यांच्या गोव्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पोर्तुगीज गोमंतकीयांवर अनन्वित अत्याचार करत असल्याचे पाहिले. ही दृश्य पाहून लोहिया प्रचंड अस्वस्थ झाले. त्यानंतर त्यांनी लगेच आपल्या काही मित्रांची सभा बोलावली, जिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र पोर्तुगीजांना या सभेची माहिती कळताच त्यांनी लोहिया यांना तुरुंगात टाकले. परंतु जनतेचा रोष पाहता पोर्तुगीजांनी लगेच त्यानं सोडूनही दिले. मात्र त्यांना पाच वर्षे  गोव्यात येण्यास बंदीही घातली आणि इथेच गोवा मुक्तीची पहिली ठिणगी पडली. 

गालावरील फुणशीसारख्या गोव्याचे स्वातंत्र्य १४ वर्षे का लांबले? | Gomantak

असा झाला गोवा मुक्तीचा संग्राम  
गोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्रातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी सहभागी होत मोलाची साथ दिली.  गोवा मुक्तीसाठी उजव्या-डाव्या, समाजवादी अशा विविध विचारांच्या व्यक्ती एकत्र आल्या होत्या.  अनेक कार्यकर्ते गोव्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एकमताने एकत्र येऊन कार्यरत होते. गोवा मुक्तीसाठी पुण्यात एक गोवा विमोचन समिती'ची स्थापना करण्यात आली. यात  सेनापती बापट, पीटर अल्वारीस, पं. महादेवशास्त्री जोशी,  एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, केशवराव जेधे, मधू दंडवते, जयंतराव टिळक, वसंतराव तुळतुळे, हिरवे गुरुजी अशा अनेकांनी सहभाग घेतला.  सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली 1955 साली पहिली तुकडी गोव्याला रवाना झाली. मात्र त्यांना  गोव्याच्या सीमेवरच पोर्तुगीजांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर  स्वातंत्र्य सैनिकांच्या असंख्य तुकड्यानी वारंवार महाराष्ट्रातून गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. राज्यात हळूहळू नियोजनबद्ध आंदोलने सुरू झाली होती.  गोव्याच्या सर्व सीमांवर स्वातंत्र्य सैनिकांनी ताबा मिळवला होता.  विशेष म्हणजे या संग्रामात महिलाही आघाडीवर होत्या. यात सुधा जोशी, कॉ. मालिनीबाई तुळपुळे, कमलाबाई भागवत, सिंधुताई देशपांडे,  प्रभा साठे, कमला उपासनी, आदि महिलांचा विशेष उल्लेख करावा लागेल. 

Goa Liberation Day: भारताला स्वातंत्र्य मिळूनही गोव्याला मुक्त करण्यास 14  वर्षे का लागली? - esakal

अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस गोव्याला स्वातंत्र्य मिळण्याबाबत एकमत होऊ लागलं.  1958 मध्ये पोर्तुगीज वसाहतवाद संपुष्टात आणण्यासाठी देशांतर्गत आणि आफ्रिकी राष्ट्रवादी नेत्यांकडूनही दबाव वाढत होता. तरीही यात एकमत होण्यास दोन वर्षाचा कालावधी लागलं. भारत सरकारच्या आदेशाची वाट न पाहता स्वातंत्र्यसैनिकांनी आपला लढा सुरूच ठेवला होता.  तोपर्यंत, कोणत्याही क्षणी भारतीय लष्कर गोव्यात शिरू शकतं, असा अंदाजदेखील पोर्तुगीजांना आला होता.  पोर्तुगीजांसाठी परिस्थिती बिकट झाली होती.  पणजी, वास्को, मडगाव, म्हापसा सारख्या शहरांत संचारबंदी लागू केली होती.  अखेरीस 18 डिसेंबर 1961 रोजी भारत सरकारने लष्कराला कारवाई करण्याचे आदेश दिले. गोव्याच्या सर्व सीमा ताब्यात घेण्यात आल्या. पोर्तुगीजांनी देखील आपले मितरदेश  ब्रिटन, अमेरिकेकडे मदतीचा हात मागितला.  परंतु या मित्र देशांनी पोर्तुगीजांना मदत करणं नाकारलं.  शेवटी 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीज गव्हर्नर वासाल द सिल्वा यांनी  शरणागती पत्करली आणि  साडेचारशे वर्षांच्या गुलामगिरीतून गोवा  मुक्त झाला.

संबंधित बातम्या