ट्रान्झिट वॉरंटशिवाय एकाला आंध्रप्रदेश पोलिसांनी नेले; गोवा खंडपीठाकडून दखल

मडगाव पोलिसांच्या याचिकेवर सुनावणी
ट्रान्झिट वॉरंटशिवाय एकाला आंध्रप्रदेश पोलिसांनी नेले; गोवा खंडपीठाकडून दखल
Goa Bench Of Bombay High CourtDainik Gomantak

पणजी: आंध्रप्रदेशातील एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी बोनावेंचर डिसोझा याला ट्रान्झिट वॉरंट न घेता मडगावातून परस्पर नेले होते. या प्रकरणी सादर केलेल्या अर्जावरील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने गंभीर दखल घेत संबंधित त्या आंध्रप्रदेश अधिकाऱ्यांकडून 8 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण मागितले आहे. याची सुनावणी 14 जूनला ठेवली आहे.

कोन्सेसाव डिसोझा याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर करून मडगाव पोलिस व आंध्रप्रदेशचे अधिकारी एस. कृष्ण किशोर (सहाय्यक अधीक्षक), के. पी. किशोर व एच. एस. हुसेन बाशा (नेल्लोर निरीक्षक) याना प्रतिवादी केले आहे. मागील सुनावणीवेळी या तिघांना उपस्थित राहण्याचे निर्देश गोवा खंडपीठाने दिले होते. त्यानुसार आज ते न्यायालयाच्या सभागृहात उपस्थित होते.

Goa Bench Of Bombay High Court
मडगावातील गटारांमध्ये कचरा

आंध्रप्रदेश पोलिस एका अबकारी गुन्ह्यात तपास करत असताना बोनीवेंचर डिसोझा याचे नाव चौकशीत पुढे आले होते. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी आंध्रप्रदेशचे पोलिस मडगाव येथे आले होते. त्यांनी डिसोझा याला ताब्यात घेण्यासाठी मडगाव पोलिसांची मदत घेतली होती. त्याला रात्री ३ वा. ताब्यात घेताच त्याच्या नातेवाईकांनी वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्यासंदर्भातची ईमेल मिळण्यापूर्वीच आंध्रप्रदेशचे पोलिस त्याला न्यायालयात हजर करून ट्रान्झिट वॉरंट न घेता गोव्यातून गेले होते. यासंदर्भात पोलिसांच्या या बेकायदेशीर कारवाईविरोधात फौजदारी याचिका सादर करण्यात आली आहे. मडगाव पोलिसांनी आंध्रप्रदेशच्या अधिकाऱ्यांना केलेल्या मदतीसंदर्भात प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण करण्यात आले, ते न्यायालयाला देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.