अंगणवाडी सेविकांना मिळणार दिवाळीची सुट्टी पण.......

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

राज्यातील अंगणवाडी सेविका दिवाळीची सुट्टी घेऊ शकतात. मात्र, त्यांच्याजवळ असणाऱ्या मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी डेटा अपलोड करण्याचे काम करावे लागणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. 

पणजी: राज्यातील अंगणवाडी सेविका दिवाळीची सुट्टी घेऊ शकतात. मात्र, त्यांच्याजवळ असणाऱ्या मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी डेटा अपलोड करण्याचे काम करावे लागणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. 

अंगणवाडी सेविकांकडे त्यांना देण्यात आलेले मोबाईल, टॅब यासारखी उपकरणे आहेत, ज्या माध्यमातून त्यांनी माहिती भरण्याचे काम करावे लागेल. राज्यातील काही अंगणवाडी सेविकांनी सुट्टीच्या बाबतीत मंत्री राणे यांची भेट घेतली असता त्यांना सुट्टी देण्याचा निर्णय मंत्री राणे यांनी घेतला आहे. या निर्णयाला राज्यातील अंगणवाडी सेविकांनी मान्य केल्याचे चित्र पहायला मिळाले. मंत्री राणे यांनी अंगणवाडी सेविकांच्या सुट्टीचा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करून घेतला आहे. 

दिवाळीची सुट्टी असल्याने अंगणवाडीत विद्यार्थी तर येतच नाहीत, त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडे असणारे इतर कामे त्या त्यांच्याकडे असणाऱ्या साधनांच्या साहाय्याने करू शकतात.  
एका अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, की कामाची माहिती ऑनलाईन पद्धतीने द्यावी लागते. त्यांनी आजूबाजूच्या गरोदर महिलांना दिलेला सल्ला, त्यासाठी घालवलेला वेळ, गावात न्यूट्रीशनचे महत्व पटवून देण्यासाठी घरोघरचा आढावा त्यांना द्यावा लागतो. हे काम सुट्टी असली तरी करावे लागत असल्याने हे काम त्यांना असणाऱ्या टॅबच्या माध्यमातून दर्शविता येते.

संबंधित बातम्या