गोमंतक भंडारा समाजाच्या निवडणुकीत घोळ ?

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

अशोक नाईक हे स्वतःला भंडारी समाजाचे अध्यक्ष म्हणवून घेत आहेत. भंडारी समाजाचे २५ जण एकत्र आले तर समाजाची आमसभा बोलवता येते अशी घटनेत तरतूद आहे. आम्ही २०० जण १२ तालुक्यांतून एकत्र आलो होतो. त्यामुळे बैठक कशी घेतली अशी विचारणा करण्याचा अधिकारच अशोक नाईक यांना नाही असे उत्तर अनिल होबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. 

पणजी :  अशोक नाईक हे स्वतःला भंडारी समाजाचे अध्यक्ष म्हणवून घेत आहेत. भंडारी समाजाचे २५ जण एकत्र आले तर समाजाची आमसभा बोलवता येते अशी घटनेत तरतूद आहे. आम्ही २०० जण १२ तालुक्यांतून एकत्र आलो होतो. त्यामुळे बैठक कशी घेतली अशी विचारणा करण्याचा अधिकारच अशोक नाईक यांना नाही असे उत्तर अनिल होबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. 

ते म्हणाले,  भंडारी समाजाचे सदस्यत्व असलेल्यास भंडारी समाजाचा फलक लावून बैठक घेता येते. ही तरतूद घटनेत आहे, ती अशोक नाईक, देवानंद नाईक आणि सुनील नाईक यानी वाचावी. मी वा कोणी समाजावर खटला दाखल केलेला नाही. फेरमतमोजणीची मागणी करण्याचा अधिकार प्रत्येक उमेदवाराला लोकशाहीत असतो. तो नाकारल्याने मी न्यायालयात दाद मागितली आहे. या साऱ्यांनी  माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले होते. मी उत्तर दिले नसते तर आरोप ऐकणाऱ्याला ते खरे वाटले असते. १९८५ मध्ये मी पंच, १९९० मी सरपंच झालो, गट सल्लागार समितीचा अध्यक्ष झालो, अखिल गोवा पंचायत परिषदेचा अध्यक्ष झालो, जिल्हा पंचायतीसाठी न्यायालयात दाद मागितली, तेथे मी सदस्य म्हणून निवडून आलो, जिल्हा पंचायत अध्यक्ष झालो. त्यामुळे मी समाजाचा अध्यक्ष झालो म्हणून पदे मिळाली असे म्हणणे चुकीचे आहे. मी भाजपचा तीन वेळा उपाध्यक्ष झालो आहे.

ते म्हणाले, समाजाकडून जातीचे प्रमाणपत्र शंभर रुपये शुल्क आकारून दिले जाते. त्यातून जमा झालेला निधी बॅंकेत ठेवला आहे. त्या साऱ्याचे लेखापरीक्षण होत आले आहे. एकदाही लेखापरीक्षणात त्याबाबत कधी आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही. कधी त्याविषयी तक्रार कोणी केलेली नाही. त्यामुळे आताच हा विषय का काढला जातो. भंडारी समाजातच गाव पातळीवरून अध्यक्षपदापर्यंत वाटचाल करताना विविध पदांवर मी काम करत आलो आहे. एक लाख ८४ हजार रुपये कोणी सहा वर्षे वापरले ते अशोक नाईक यानी सांगावे. त्यांना दुसऱ्यांकडे बोटे दाखवण्याचा अधिकार नाही. मी निवडणुकीला आव्हान दिले आहे. १८४ मते कशी वाढली, ते समजले पाहिजे. २८६८ मतदान झाले तर ३ हजारावर मते कशी पडली. उपेंद्र गावकर, सुनील  सांतिनेजकर हे यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या