नगरसेवकाचा अहंकार दुखावल्याने म्हापसा पोलिस उपनिरीक्षकांची अन्यत्र बदली

Anil Polekar Sub Inspector Mapusa Police Station was transferred due to hurt ego of the corporator
Anil Polekar Sub Inspector Mapusa Police Station was transferred due to hurt ego of the corporator

म्हापसा : म्हापसा पालिकेचे(Mapusa Municipality) नवनिर्वाचित भाजप(BJP) नगरसेवक पोलिस(Police) अधिकाऱ्यांपेक्षा वरचढ असल्याचे गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या म्हापसा शहरातील एकंदर घडामोडींवरून निष्पन्न झाले आहे. एका नगरसेवकाचा अहंकार दुखावल्याने म्हापसा पोलिस स्थानकातील उपनिरीक्षक अनिल पोळेकर यांची सध्या अन्यत्र बदली झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील(Goa) अन्य भागांप्रमाणेच म्हापशातही संचारबंदी(Lockdown) लागू असून त्यासंदर्भात कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच राजकारण्याच्या दबावाने सध्या कारवाई केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी त्या पोलिस अधिकाऱ्याने टाळेबंदीच्या काळात इतरांप्रमाणे भाजपच्या एका नेत्याला पकडले होते व त्याला त्यासंदर्भात विचारले असता आपण भाजप कार्यकर्ता असल्याचे त्याने सांगितले होते.(Anil Polekar Sub Inspector Mapusa Police Station was transferred due to hurt ego of the corporator)

तसेच, काही महिन्यांपूर्वी टाळेबंदीमुळे नाकाबंदी सुरू असताना हेल्मेट न वापरता शहरात दुचाकीवरून विनाकारण घिरट्या घालत असल्याच्या आरोपावरून त्या उपनिरीक्षकाने एका भाजप कार्यकर्त्याला पकडले होते. तेव्हा पोलिसांशी त्या भाजप कार्यकर्त्याने हुज्जत घालून त्या सार्वजनिक ठिकाणी जणू धिंगाणाच घातला होता. तुमची बदली करण्यास भाग पाडेन असा इशारा त्या वेळी त्या भाजप कार्यकर्त्याने पोलिसांना दिला होता.

खोर्ली येथे तीन दिवसांपूर्वी दोन गटांत झालेल्या हाणामारीवेळी त्या अधिकाऱ्याने भाजपचे एक नगरसेवक स्वप्नील शिरोडकर यांना चांगल्यापैकी चोप दिला होता. रात्रीच्या वेळी दहाच्या सुमारास ते भांडण झाले असता लोकांनी पोलिसांना कळवल्यानंतर तिथे पोलिस दाखल झाले होते. पोलिस ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना त्या वेळी नगरसेवक स्वप्नील शिरोडकर व त्यांच्या भावांनी एका गृहरक्षकाला ढकलल्यामुळे व त्याच्यावर लाथाबुक्के मारल्याने पोलिस संतप्त झाले होते व त्यामुळेच त्यांनी शिरोडकर यांना चांगल्यापैकी प्रत्युत्तर देत म्हापसा पोलिसात नेले होते व तिथेही त्यांची यथेच्छ धुलाई केली होती. त्या वेळी ड्युटीवर असलेल्या श्री. पोळेकर या पोलिस अधिकाऱ्याने एकंदर घडलेल्या घटनेबद्दल शिरोडकर यांना दमदाटी केली होती. त्या दरम्यान दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी पोलिस स्थानकात सादर केल्या होत्या. त्याच वेळी काही जणांनी त्या प्रकरणाबाबत वरिष्ठ भाजप नेत्यांशी संपर्क साधल्यामुळे केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्याच रात्री सुमारे दोन वाजता शिरोडकर यांना सोडून देण्यात आले होते.

आपण नगरसेवक असतानाही मला सर्वांसमक्ष पोलिस स्थानकात नेऊन व त्यानंतर मला दमदाटी करून पोलिसांनी लोकांसमोर माझी मानहानी केल्याचे कारण पुढे करून त्याबाबत त्या नगरसेवकाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला होता व त्यानुसारच त्या नगरसेवकाला पोलिस स्थानकातून जाऊ देण्यात आले होते. भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिस कारवाई करीत असल्याच्या रागाने भाजप नेत्यांनी आणलेल्या दबावामुळे त्या उपनिरीक्षकाची काही दिवसांपूर्वीच अन्यत्र बदली करण्यात आली होती; तथापि, म्हापसा पोलिस स्थानकात सध्या मनुष्यबळाची संख्या कमी असल्याचे कारण पुढे करून त्यांना कामावरून ‘रीलिव’ करण्यात आले नव्हते. आता नगरसेवकाला अद्दल घडवल्याच्या घटनेनंतर श्री. पोळेकर यांच्या बदलीबाबत लगेच कार्यवाही झाली.

या पूर्वीच्या सर्व घटनांबाबत भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी तक्रार केल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी थोडीफार मवाळ भूमिका घेतली होती. तथापि हल्लीच्या दोन घटनांमुळे भाजप नेते खूपच आक्रमक झाले होते व त्यामुळेच त्या पोलिस उपनिरीक्षकाची थेट बदली झाली, हे स्पष्ट होते.

राजकीय आदेशानुसार पोलिसांचे कामकाज
दरम्यान, अशा प्रकारे राजकीय पक्षांच्या आदेशानुसार पोलिस स्थानकाचे कामकाज चालले तर गुन्हेगारांवर कुणाचाही वचक राहूच शकत नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया पोलिस कर्मचाऱ्यांत व्यक्त केल्या जात आहेत. अशा घटनांमुळे पोलिसांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com