गोवा सरकारला केंद्रीय योजनांची भरीव मदत: पशुसंवर्धन मंत्री गिरीराजसिंह

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

केंद्रीय मत्स्योद्योग, दुग्धोत्पादन, पशुसंवर्धन मंत्री गिरीराजसिंह यांनी गोवा सरकारला  केंद्रीय योजनांची भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

पणजी: केंद्रीय मत्स्योद्योग, दुग्धोत्पादन, पशुसंवर्धन मंत्री गिरीराजसिंह यांनी गोवा सरकारला  केंद्रीय योजनांची भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत   यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली या बैठकीत राज्य सरकारचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राज्य सरकारकडून केंद्रीय मदतीसाठीचा आराखडा सादर करण्यात आला तो आराखडा विचारात घेऊन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी सरकारला शक्य ती सर्व मदत करू असे आश्वासन दिले आहे. गोवा सरकारने केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेसारखीच स्वयंपूर्ण गोवा योजना जारी केली आहे. त्यासाठी कृषी, मत्स्य, दूध आणि भाजीपाल्याच्या क्षेत्रात गोव्याला इतर राज्यांवर अवलंबून रहावे लागू नये  अशी व्यवस्था करण्यात येत आहे, त्यासाठी केंद्र सरकारकडून ही मदत मागण्यात आलेली आहे. गोवा सरकारच्या यंदाचा अर्थसंकल्प स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेवर असणार आहे त्या  अर्थसंकल्पात या केंद्रीय मदतीचा उल्लेख असणार आहे.

video: जीवावर उदार व्हावं पण किती? चालत्या ट्रेनमध्ये दिव्यांगाचा चढत होता अन् ... -

 

संबंधित बातम्या