Goa Crime: नागवा येथे अमली पदार्थ प्रकरणात एकाच्या मुसक्या आवळल्या

दीड लाखांचे अमली पदार्थ जप्त
Drug Accused Arrested by porvorim police
Drug Accused Arrested by porvorim policeDainik Gomantak

गोवा पोलिसांनी अमली पदार्थविरोधातील कारवाईचा वेग वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर आज बार्देश तालुक्यातील नागवा येथे पश्चिम बंगालच्या एकाला अटक केली आहे. कारवाईवेळी संशयिताकडून सुमारे दीड लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

(Animesh Roy from West Bengal arrested in Narcotics case in Nagoa)

Drug Accused Arrested by porvorim police
Cattle Slaughtering Goa: गोवंश कत्तल! गोवा सरकार जनावरांच्या वाहतुकीवरील बंदी उठवणार

मिळालेल्या माहितीनुसार आज गोवा पोलिसांना नागवा येथे एक व्यक्ती गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव अनिमेश रॉय ( 21वय ) असे आहे.

Drug Accused Arrested by porvorim police
Goa News : पर्यटनासाठी डिचोलीचा विकास करणार | Bicholim to be developed for tourism | Gomantak Tv

कारवाई दरम्यान पोलिसांनी रॉय याच्याकडून 1.650 किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याची किंमत सुमारे 1.60 लाख आहे. पोलिसांनी हा गांजा जप्त केला आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तसेच संशयित आणखी कोणत्या गुन्ह्यात समाविष्ट आहे का ? याचा तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com